खरे धर्मवीर कोण?
देव, देस आणि धर्मापायी जीव घेतला...
शुर आम्ही सरदार काय आम्हाला भिती..
हे गाणे ऐक्ल्यावर अंगावर रोमांच न उगवले तरच नवल! अशा थोर ऐतिसासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेले आपण भारतवासी सध्या नक्की काय करतोय? याचा विचार करायला तरी कोणाला वेळ आहे का? गेल्या 700 वर्षांचा किंवा पुराणकालीन संदर्भ बघितल्यास सगळे देव, लोक, संत, ऋषीमुनी हे धर्मासाठीच लढलेले आहेत. आपल्या गीतेची तर टॅगलाइनच( घोषवाक्यच) आहे,” यदा यदाहि धर्मस्य...ग्लानीर्भवतू भारत” तेव्हा तेव्हा असेच धर्मवीर जन्माला येतात. शिवाजी महाराज, संभाजी राजे, भगतसिंह, गुरु गोविंदसिंह, संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, वीर सावरकर, स्वामी विवेकानंद,.. अशी अनेक नावे डोळ्यासमोर येतील. हिंदुस्थानाची ही परंपराच आहे. अनेक परकिय आक्रमणे या देशावर, धर्मावर झाली पण घट्ट पाय रोवून उभा असणारा आणि इतरांनाही सामावून घेणारा आपला हिंदू धर्माचे म्हणून तर परकियांना नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे.
“हिंदुस्थानात राहणारा तो हिंदू” अशी साधी, सोपी व सरळ व्याख्या करणारे “वीर सावरकर” म्हणूनच आदरणीय ठरतात. त्यांच्या एवढा राजकारण, साहित्य, देशप्रेम, संस्कृतप्रेमी आणि समाजसुधारक असे बहुआयामी व्यक्तिमत्व क्वचितच आढळेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी आधीच देऊन ठेवली होती. हे जेव्हा लोकांना समजानेसे झाले तेव्हा त्यांनी स्वत:च स्वत:ला प्रायोपवेशन (सजीव/सदेह समर्पण) केले. कदाचीत त्यांचे तेव्हा ऐकले असते तर आज जी आपल्या समाजाची अवस्था झाली नसती. असो. अजुनही वेळ गेलेली नाही. आजही आपण सर्वच जण आपापला धर्म जगवू शकतो. याचा अर्थ असा नाही की, दुस-यांचा धर्माचा अनादर करणे.
सर्वधर्म समभाव आणि सद्भावना अशी चतुरस्त्र भुमिका कायद्यानेही स्विकारलेली असल्यामूळे कोणी उच्च-निच्च हा प्रश्नच उद्भवत नाही. याचा अर्थ असाही काढू नये की” आओ जाओ, घर तुम्हारा” किंवा ”उंटाला दिली ओसरी, उंट हात-पाय पसरी” असेही नको व्हायला. थोडक्यात, इथे राहता तर इथले नियम सांभाळूनच राहावे लागेल. अन्यथा “न राहणेच योग्य” हा इशारा देण्याची वेळ आता आलेली आहे. तसेच आक्रमण आणि कट्टरता ही कालानुरुप बोथट व्हावयास हवी. कोणताही धर्म माणुसकी सांभाळूनच टिकतो. अत्याचार, मनमानी किंवा दहशतवाद याचे कोणीही समर्थन करु नये. जर असे होत असेल तर वेळीच त्यावर उपाय योजणे हे सर्वसामान्य नागरीक, सरकार तसेच समाजसुधारकाचे आद्य कर्तव्य असावयास हवे. प्रत्येक राजकारणी पक्ष धर्माचे भांडवल करुन जिंकत असेल तर आपण तसे कमनशीबीच म्हणावे लागेल. देशाकडून धर्माला नेणारा किंवा धर्माकडून देशाला नेणारा तो सुजाण नागरिक म्हणता येईल.
आक्रमकांचा मुख्य हेतू आजपर्यंत तोच होता जो आजही दिसून येतो, ” धर्म बुडविणे, अनाचार माजविणे, गरिबी, अज्ञानाचा फायदा घेऊन सामन्याची दिशाभुल करणे” हे ज्याला जमते तो सत्तेवर येतो अशी सर्वसाधारण राजकारण खेळले जाते. ज्या धर्माच्या नावाने राजकारण खेळणारे आजचे राजकीय नेते आणि त्यांना खतपाणी घालणारे आपण एक-दिवस तो धर्मच आपल्याला बुडवेल याची भिती कशी वाटत नाही याचे मला आश्चर्य वाटते. वास्तविक कोणीही कोणाच्या धर्माआड येणे हा एक कायद्याने तर गुन्हा आहेच पण माणुसकीलाही काळीमा फासणे असे होईल. शेवटी समाजहीत आणि माणुस समृद्ध होणे हे कोणत्याही धर्माचे वैशिष्ट्य असते. कालांतराने अनिष्ट रुढी-परंपरा नष्ट होतात त्यासाठीही असलेली सजगता आणि देश-धर्म कर्तव्य समजूनच काही नियम, बंधने लादलेली असतात. ती जर जाचक वाटत असतील तर त्यातूनही सोय शोधणे हे प्रत्येकाचे कर्तव्य होय. याचा अर्थ असा नाही होत की, आम्हाला काहीच अटी/शर्ती मान्य नाहीत.
परदेशात कित्येकवेळा मी अनुभवले आहे की, परंपरा-पोशाख आणि वागणुकीचे संस्कार केले जातात पण इथे राहणारे मात्र हे सगळे टाळणेच श्रेयस्कर किंवा आम्ही “आधुनिक”आहोत या गोंडस नावाखाली टाळण्याचे करतात. वेळच्यावेळी नमाज पढणे, चर्चमध्ये जाणे, गुरुद्वारात जाणे जर सोडत नसतील तर आपल्याला देवळात जाण्यास कमीपणा का वाटावा? बरे, असेही नाही अमुक वेळातच जा, या दिवशीच जा” कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जाऊ शकता. कोणतेही नियम जेवढे हिंदू धर्मात लवचिक आहेत तेवढे इतर धर्मात आहेत का? याचा जरूर विचार आपल्या लोकांनी करावा. परंपरा मोडल्या म्हणजे पाप लागते हेही मानत नाही आपण. तुमच्या शांती-समाधानासाठी हे नियम पाळले तर तुमचेच भले, नाहीतर कुणी शिक्षा करणार नाहीत. तरीही आम्ही हे काही पाळणार नाही असा ठाम नकार हल्लीची पिढी देते हे बघून आश्चर्य वाटते.
ज्या देव असण्यावरुन वाद घालणारे लोक “समस्या” उद्भवल्यानंतर तासनतास देवळात प्रवेशासाठी रांगेत उभी राहायला तयार! स्पर्धा, संपत्ती आणि धडपड करण्यासाठी लागणारी मन:शांती कोण देणार तुम्हाला? तुमचे संस्कार कि, आधुनिक तंत्रज्ञान? धर्मात अध्यात्म्य शिकविले जाते. जिथे विज्ञान संपते तिथे अधयात्म्य सुरु होते असे म्हणतात. याचा आधार आपल्याला कधी तरी घ्यावा लागणारच आहे तर लहान वयात का नको? तहान लागल्यावर विहीर कुणीही खोदणारच पण पाण्याची तहान लागणार त्यासाठी आधीच तशी करणारे सुजाण नाही का? त्यासाठीचे प्रयत्न बालक, पालक आणि शासन सगळ्याच स्तरावर झाले पाहिजेत.

Comments
Post a Comment