संत ज्ञानेश्वर
लहानपणी “संत ज्ञानेश्वर” चित्रपटाची आठवण झाली जेव्हा नुकताच“संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई”मराठी चित्रपट बघितला. यावर्षी जानेवारित पंढरपुरलाही जाऊन आले तरी अजुन आपण संत ज्ञानेश्वरांबद्दल कसे लिहिले नाही? नुकतीच वारीचीही सुरूवात झाल्यामुळे आता हा लेखनप्रपंच. संत परंपरा ही भारताला/महाराष्ट्राला मिळालेली अनमोल देणगी आहे असे मला वाटते. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे ही आद्य दैवते/“संतांचे गुरू” असेही म्हणता येईल. “गुरु-माऊली” म्हणण्याची प्रथा त्यांच्यामुळेच पडली असावी. संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला “ज्ञानेश्वरी”,“अमृतानुभाव”, पसायदान आणि त्यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या रचना, तसेच वारीची प्रथा सुरू करुन विट्ठलाची निस्सिम भक्ती,आध्यात्मिक ओढ आणि सर्वसामान्य जनतेला“वाली”मिळवुन दिला. पंढरपुर हे तीर्थक्षेत्र म्हणुन नावाजले गेले अगदी “कानडा विठ्ठलु” कर्नाटकाचा असुनही महाराष्ट्रात रमला. भक्तांनीही त्याला आपला” देव”मानुन सदैव त्याची भक्तीच केली.
“संन्याशाची पोरे”म्हणुन हिणवले जाऊनही ज्ञानेश्वरांनी कायम जनहिताचाच विचार करुन संस्कृतमधली “भग्वदगीता”प्राकृत मराठीत आणली. सर्वसामान्य माणसाला वाचायला सोपी जावी, कळावी आणि तसे वर्तन घडावे” केवढा हा उदात्त हेतु. अवघ्या 16 व्या वर्षी “ज्ञानेश्वरी” लिहिणारे संत ज्ञानेश्वर किती महान असावेत याची कल्पना यावरुन आपणांस यावी. विश्वची माझे घर समजुन पसायदान लिहिले ,रुणुझुणू रे भ्रमरा, मोगरा फुलला-तुज सगुण म्हणु कि निर्गुण..,कानडा विट्ठलु.. भेटी लागी जीवा.. सुंदर ते ध्यान.. माझे माहेर पंढरी.. सारखी अनेक अर्थपुर्ण अभंगांची रचना करुन प्रत्यक्ष जीवन कसे सार्थकी लावावे याचा आदर्ष वस्तुपाठच माऊलिंनी घालुन दिला असेच म्हणावे लागेल. अनेक प्रसंग, रेड्याचे तोंडुन वेद म्हणुन घेणे,चोखामेळ्याला सामोरे जाताना भिंतीलाच चालवुन नेणे, मुक्ताबाईंची इच्छा पुरी करण्यासाठी स्वत:च्या पाठिवर मांडे भाजणे असो,किती चमत्कार आणि त्यातुन होणारा अर्थभेदांचे कसे वर्णन करु?
3 भाऊ आणि मुक्ताई असे 4 जण अनाथ झाल्यानंतर एकमेकांना सांभाळुन राहणारे भाउ-बहिण आणि त्यांची कथा वाचुन, ऐकुन,पाहुन डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. हे सगळे कशासाठी तर सर्व-सामान्य जनतेविषयी असलेली आस्था,तिचे भले/कल्याण व्हावे,कर्मठ विचारांमुळे होणारे नुकसान टळावे, जातीभेद नष्ट व्हावा, अज्ञान,गरिबी आणि पापभिरुपणाचे उच्चाटन व्हावे या उदात्त हेतुने. निवृत्तिनाथ एकीकडे मोठा भाऊ तर दुसरीकडे “गुरू” म्हणुन त्यांची दिक्षा घेणारे तसेच छोट्या मुक्ताईला सांभाळुन घेणारे बंधु,ज्ञानेश्वर जेव्हा निराश होउन (लोकांकडुन अवहेलना) घराचे दार लावुन चिंतन करतात तेव्हा हिच मुक्ताई “ताटी उघडा ज्ञानेश दादा” म्हणुन विनवणारी लहान बहिण मोठी कधी होते याचे खरेच आश्चर्य वाटते. वय केवढे, समज केवढी आणि प्रगल्भता किती याची काही टोटलच लागत नाही. वैश्णव धर्माची पताका आणि वारीची प्रथा पुढे नेणारे “तिघे भाऊ आणि मुक्ताई” खरेच महाराष्ट्राला मिळालेली ही अनमोल रत्ने आहेत.
सुमारे 800 वर्षापुर्वी सुरु झालेली “वारीची” प्रथा आजही दरवर्षी आषाढी एकादशीला सुरू असते. त्यात लहान-मोठे, सगळया जातीचे, एकत्रित/सामुहिक चालत पंढरपुरला जातात आणि भक्तीभावनेत तल्लिन होउन, भजन,किर्तन,दिंडी यात्रेत सामील होतात. शिस्तबद्ध आखणी,नियोजन आणि जेवण-खाण सगळे स्वत:चे स्वत: करुन खातात,रात्री मुक्काम ठराविक ठिकाणी ठरलेला असतो.हा एक समता,प्रेम आणि सेवेचा सोहळा/उत्सव असतो. अशा या परंपरेचे पाईक या नात्याने अजुनही ही वारी अशीच सुरु राहावी आणि लोकांनी त्यानिमित्त्य त्यांच्या संसारातील दु:ख विसरावे या हेतुने सुरु केलेली वारी सगळ्यांनाच प्रेरणा देवो ही सदिच्छा आणि प्रार्थना. एकदा वारिला जायचे आहे कधी माऊली बोलावते ते बघायचे, असे योगही यावे लागतात.
संत हे परमेश्वर, निसर्ग आणि मानव यातिल दुवा बनण्याचे काम करतात. 21जुन हा सगळ्यात मोठा दिवस तसेच “आंतरराष्ट्रिय योग दिन” म्हणुनही साजरा केला जातो.“योग”हा जसा शारीरिक समृद्धिसाठी,तसा“भक्तियोग”हा मानसिक समृद्धीसाठी आवश्यक आहे.
“आंतरराष्ट्रिय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!”

Comments
Post a Comment