स्थलांतरीत जीवन
दरवर्षी कित्येक मैल प्रवास करुन शिवडी,ठाणे येथे वेगवेगळे पक्षी( फ्लेमींगो,सिगल, माळढोक,..) येतात आणि आपण मुद्दाम त्यांना पाहायला आपण देखील जातो. काय असेल ना त्यांची जिद्द,चिकाटी कि हवामानामुळे नाईलाज म्हणुन येत असावेत. शासनातर्फे,वेगवेगळ्या राज्यांतर्फे,देशातर्फे अशी पक्षी,प्राण्यांची देवाणघेवाणही आपापसांत होत असते. जसे राणीबागेत पेग्विन आले किंवा चित्ते, सिंह यांनाही बाहेरुन आणले जाते. एकतर त्यांची पैदास येथे होऊन इथला निसर्ग समतोल राखला जावा तसेच आपापसातील राजकीय,आंतर-राष्ट्रीय संबंधही प्रस्तावित व्हावेत हाही एक हेतु असतो. नेहरुंनी तसे एक हत्तिचे पिल्लू जपानला भेट दिले होते म्हणे. तर असे हे प्राणी-पक्षी आणि माणुससुद्धा स्थलांतर करीतच असतो. गरिबी हे एक प्रमुख कारण असले तरी आरोग्यसेवा आणि शिक्षण सुविधांचा आणि वाढती लोकसंख्या असे इतर घटक लोकांना स्थलांतर करण्यास प्रवृत्त करतात. नैसर्गिक आपत्ती जसे कि, पुर,चक्रिवादळ,दुष्काळ,भुकंप व अशांतता( दहशतवाद) हेही कधी कधी मानव व पशु-पक्षी स्थलांतरास भाग पाडतात.
पुर्वीच्या काळी आक्रमण, विजय, वसाहत या
कारणाने स्थलांतर हे वैयक्तिक,कौटुंबिक किंवा मोठया स्वरुपात होत असे.आदी-मानव नदी,गुहा
आणि शेतीयोग्य जागा बघुन मुक्काम करीत. अजुनही अशा काही जाती आहेत जे कायम फिरतच
असतात त्यांना आता काहीजण “भटक्या विमुक्त जाती” असे म्हणतात. कामासाठी आणि इतर
अनेक कारणांनी हे असे हे स्थलांतर होत असे. बहुधा पोटा-पाण्यासाठी, कुतूहल म्हणुन तर कधी काळाची
गरज म्हणून होत असते. पर्यटनाच्या सोयी , दळणवळाणाच्या वाढत्या सोयी, वाहतुक व्यवस्था
आणि जग सगळे एकत्र आल्यामुळे तर आता तर स्थलांतराच्या सीमा परदेशातपण जास्तच विस्तारल्या
आहेत. माझे वडिल 100 वर्षांपुर्वी गावाहुन मुंबईत आले तर आता माझी पिढी ( प्रमाण
कमी असेल) आणि माझी मुले/इतर सुद्धा अमेरिकेत किंवा इतर ठिकाणी जातातच. एकुण
स्थलांतर हे जीवनाचे अविभाज्य घटक समजण्यास हरकत नाही.
स्थलांतर हे जर सगळ्यांच्याच सोयीचे असेल तर मुळीच
हरकत नाही. जेव्हा बाहेरुन आल्यामुळे स्थानिकांच्या हक्कांवर गदा येत असेल,तिथल्या
सोयी सुविधांवर ताण येत असेल तर नक्किच याचा विचार करावा लागेल. जो मुद्दा ट्रंप सरकार
किंवा इथे काही वर्षांपुर्वी निवडणुक जिंकण्यासाठी राजकिय नेते वापरत असत. असे प्रश्न
खरेच सोडविले जातात का? हा वादाचा मुद्दा असु शकतो. राजकिय अस्थिरता, युद्ध,
मानवादिकार उल्लंघन/सामाजिक भेदभावामुळे देखील अनेकवेळा लोक स्थलांतर करतात. पुर्वी ऋषीमुनी,संत-महात्मे आध्यात्मिक
प्रगतीसाठी हिमालयात किंवा इतर ठिकाणी जात असत हेही एक स्थलांतरच असायचे.
हिंदुधर्मानेसुद्धा चौथा आश्रम “संन्यासाश्रम” या अर्थानेच सुचित केलेला होता.“सर्वसंग”परित्यागासाठी
पण आता घनदाट जंगल,डोंगर राहिलेच नाहित तर जाणार कुठे? त्याऐवजी आता वृद्धाश्रम
वाढत आहेत.
नाईलाज म्हणुन जेव्हा स्थलांतर होते तेव्हा कधी
एकदा “आपल्या गावी/शहरात परत जातो” म्हणुन माणुस वाट पहात असतो. ही कठिण प्रक्रिया
पुर्ण करण्यासाठी वैयक्तिक गरज व परिस्थिती अवलंबुन असते. खरे तर हा ज्याचा त्याचा
वैयक्तिक प्रश्न असतो पण काहिजण नवीन वातावरण, माणसे, हवा,पाणी आणि एकुणच तडजोड
करायला नाखुष असतात तर काहिजण स्वेच्छेने ही तडजोड स्विकारतात. प्रसंगी स्वत:च्या आवडी-निवडी
बाजुला ठेऊन नवीन पद्धत व इतर सगळया बाबी अंगिकारतात. तरी एका ठराविक कालावधीनंतर
त्यांना (काही जणांना) मातृभुमीची ओढ निर्माण होते आणि त्यातले काहिजण परत
येतातही. नवनवीन आव्हाने,संधी आणि परिणांम यांचा विचार करता हेही तेवढेच आवश्यक
आहे. साहस/धाडस म्हणुन फिरणारे,तात्पुरते स्थलांतर करणा-यांना एवढा काही त्रास होत
नाही उलट काहिजण त्याचाही आनंद घेतात.
स्थलांतरामुळे
अनेक शहरे किंवा राष्ट्रे स्थानिक लोकांकडुन त्यांची संस्कृती आणि श्रद्धा
गमावतात. बेरोजगारी,गुन्हेगारीत वाढ होणे,संसर्गरोग वाढण्याची शक्यता निर्माण होते.
तसेच जे अनधिकृतपणे वास्तव्य करणारे ही प्रत्येक देशाची,राज्याची डोकेदुखी बनते.
यांच्यामुळे खेडी,देश ओसाड होतात तर तेथील लोकांना हे “उपरे”(गांव सोडुन गेलेले)
असे वाटतात. प्रत्येक गाव, खेडे, शहर अशा अनेक समस्यांनी सध्या त्रस्त आहेत. यावर
लवकरच सगळ्यांना विचार करावा लागेल. त्यासाठी साधनसंपत्तीचा हक्क, मतदानाचा,शिक्षणाच्या
हक्कावर गदा येते हेही लक्षात घेतले पाहिजे. तसेच बुद्धिचा -हास, शहरे बकाल होण्याची
कारणे,येणा-या माणसाला त्या जागेविषयी असलेली अनास्था. त्यासाठी कडक कायदे केले
पाहिजेत. मुंबई, बॅंगलोर किंवा इतर कोणतेही राज्याची अवस्था सध्या कठिणच होत चालली
आहे. यावर लवकरच निर्णय घ्यावा लागेल. तुम्हाला काय वाटते?

Comments
Post a Comment