एक होते झाड

                 नुकतेच“मारुती चितमपल्ली”अरण्यऋषी यांचे निधन झाले,ऐकुन वाईट वाटले. अशा असमान्य व्यक्तींचे निधन मनाला चटका लावुन जाते. जसा “एक होता कार्वर” तसेच एक होते “चितमपल्ली” असे आता म्हणावे लागेल. त्यांचा अभ्यास,निरिक्षणशक्ती आणि जंगलावरील प्रेमाबद्दल एक आम्हाला धडा होता त्यावरुन त्यांची ओळख झाली. नंतर जेव्हा जेव्हा आमचा जंगलात फिरण्याचा योग आला तेव्हा तेव्हा हा अभ्यास किती महत्वाचा आणि मनोरंजक, उत्कंठावर्धक आहे याची जाणीव आहे. तसे बघायला गेले तर “निसर्गाच्या प्रेमात”न पाडणारा माणुस विरळाच म्हणावा लागेल.

             “अरण्यऋषी” हा किताब मिळण्याएवढे त्यांचे उत्तुंग व्यक्तीमत्व एकदा त्यांची मुलाखत ऐकली तेव्हा दिसले. वनाधिकारी म्हणुन नोकरी पत्करल्यानंतर श्री.चितमपल्ली सरांनी आयुष्याची 73 वर्षे एवढा काळ घालविला. जंगल, प्राणीजीवन पक्षीजीवन,मत्स्य जीवनावर आधारित कोष तयार करणे हे सोपे काम नाही. पुढिल पिढिला त्याचा उपयोग व्हावा, त्यात भर घालावी, केवढी ही तळमळ आणि ओढ! बारकावे रेखाटणे, लेखन अतिशय ओघवत्या शैलीत करणे,नोंदी जपणे, पुस्तक लेखन आणि नामकरण (नवीन मिळालेल्या जातींचे),त्यासाठी आदीवासींची मदत घेणे, अशा अनेक गोष्टिंनी त्यांनी आम्हाला समृद्ध करुन ठेवले आहे. परदेशात असते तर किती कौतुक,सोयी-सुविधा दिल्या गेल्या असत्या. तरीही शेवटपर्यंत त्यांनी या कार्याला वाहुन घेणे हे आपल्याला नतमस्तकच करते.

             नॅशनल जिओग्राफिक चॅनेल किंवा डिस्कवरी चॅनेलवरुन ही निसर्गाची भुक/ओढ थोड्याफार प्रमाणात भागविली जाते. लहानपणापासुन जे मोबाईल, सामाजिक माध्यमांचे वेड लागते हे टाळण्यासाठी हा एक उपाय होऊ शकतो. स्वत: जंगलबुक वाचणे ,निरिक्षण करणे, टिपण काढणे हे एक दिर्घकालिन अभ्यासाचे काम होऊ शकेल. एक छंद म्हणुन निदान एक झाड लावुन त्याचे निरिक्षण करणे हा एक अत्यंत आनंददायी प्रकार असतो. हे मी स्वानुभवावरुन सांगु शकते. तुम्ही म्हणाल “मुंबई”सारख्या  ठिकाणी कुठे हे शक्य आहे हे?” मनात असले कि सगळे काही शक्य असते. कुंडित ही तात्पुरती भुक तुम्ही भागवु शकता. झाडे मोठी झाली कि मग कुणाला तरी देऊन/नेऊन मोठ्या जागेत लावायची. असे अनेक छोटे छोटे प्रयत्नच नंतर मोठे ठरु शकतात. काहिच नाहितर निदान आपले घर  आणि आपण तरी प्रसन्न ठेऊ शकु/राहु ना!

             धाडसीपणा, एकटे फिरण्याची सवय आणि फोटोग्राफीद्वारे आपण वेगवेगळे आनंद/माहिती जमा करुन लोकांपर्यंत पोहोचु शकतो. जनजाग्रती करुन आहे ती जंगले तरी वाचवली पाहिजेत. प्रगती हवी पण निसर्गावर मात करून तर मुळिच नको, पर्याय आपणच शोधले पाहीजेत. एक झाड तोडले तर 10 तेवढीच लावण्याची जबाबदारीही घेतली पाहिजे. आमच्या कार्यालयामार्फत दरवर्षी 100 झाडे लावण्याचा उपक्रम राबविला जातो. त्याचबरोबर त्याची काळजी आणि संवर्धन घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावर घातली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावुन तसा अहवाल तयार केला जातो. गरज असेल तिथेच ही झाडे लावली जातात. नाहितर नुसते फोटो काढण्यापुरतेच वृक्षारोपण,स्वच्छता,कपडे-वाटप आणि भांडी-वाटप असे केले जात नाही. याबद्दल मला नक्किच आम्हा सर्वांचा अभिमान वाटतो, विशेष करुन महिला जास्त भाग घेतात हेही कौतुकच वाटते.

           पुर्वीचे ऋषीमुनी का एवढे दुरदर्षी आणि समाजाचे हितचिंतक होते याचे उत्तर तुम्हाला यावरुन मिळेल. एकतर कायम ते जंगलात राहायचे. जप-तप-साधना करुन सिद्धी मिळवायचे आणि मग लोक-कल्याणार्थ राजाला,  प्रजेला उपदेश करुन त्यांच्याकडुन समाजहित कसे साधले जाईल यावर त्यांचा कटाक्ष असे. कित्येक शोधाचे ते जनक आहेत. हजारो वर्षांची आपली परंपरा आपल्याला हेच सांगते”निसर्गाला जवळ करा, त्याच्यावर मात करु नका.”विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आपण कितीही पारंगत झालो तरी अजुनही काही गोष्टी आपल्या हातात नाहीत हे आपण लक्षात घेऊनच वागले पाहीजे. त्यासाठी शिस्त,संस्कार आणि मार्गदर्षन घेणेही महत्वाचे असते ते आपल्याला अशा लोकांकडुनच मिळु शकते आणि ते आपण जरुर घ्यावे हिच ह्या “एका” झाडाकडुन प्रार्थना. हो आपणही एक चालते बोलते“झाड”आहोत हेही लक्षात घेऊनच वागल्यास काही कमी पडणार नाही माणसाला.

               जंगलामुळे काय फायदे होतात हा एक सविस्तर विषय होऊ शकेल. सध्या आपण ग्लोबल वार्मिंग आणि प्रदुषणाचे उपाय शोधायचा झाल्यास नक्किच झाडांची मदत घेऊ शकतो. जसा एखादा कर्ता मनुष्य/बाई घराची,घरातल्यांची काळजी घेत असतो. तसेच झाड हेही खाणे,राहणे,सावली,फळे,फुले आणि मुख्य म्हणजे तापमान नियंत्रित करण्यासाठी मनुष्याला मदत करतो. आदी मानव हे सर्व जाणुनच निसर्गाच्या बरोबरिने राहायचा त्यामुळे त्याला आत्तासारखे त्रास होत नव्हते. याशिवाय जंगलचे, प्राण्यांचे नियम व कायदे हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल. निसर्गचक्राची भुमिका झाड अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडित असतो. माणुस मात्र आता त्यांच्या मुळावरच घाला घालतोय. अजुनही वेळ गेलेली नाही आता तरी आपण सावध होऊन पुढे होणारे अनर्थ टाळायचा प्रयत्न करुया. हिच सरांना एक मोठी श्रद्धांजली ठरु शकेल.

 




                

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव