अर्थशास्त्र आणि अध्यात्म
माझा आवडता विषय अर्थशास्त्र,शिक्षण,नोकरीही त्यातच असल्यामुळे जास्तच आवडायला लागला. दैंनंदिन आयुष्यातही हा महत्वाचा घटक आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. काही जणांना किती “कंटाळवाणा”विषय आहे असे वाटु शकेल. समृद्ध आणि सुखी आयुष्य जीवन जगण्यासाठी ह्याचा अभ्यास सगळयांनाच थोडा आवश्यक आहे असे मला वाटते. अर्थशास्त्र म्हणजे काय रे भाऊ? असे विचारले तर साधे उत्तर असे सांगता येईल. “पैशाबाबत आणि इतर आनुषंगिक बाबींची सांगड घालणे.” एखाद्या देशाची, कुटूंबाची किंवा अगदी व्यक्तीचासुद्धा दर्जा यावरुन ठरविला जातो.
वाणिज्य शाखेत,एम.बी.ए. करताना अगदी
विज्ञानातसुद्धा याचा अभ्यास केला जातो. ज्यात साधने आणि त्याचा जास्तीत जास्त
वापर,बॅंका,विमा,पैसा आणि इतर अनुषंगिक व्यवसायांचाही अंतर्भाव असतो. व्यापार,उद्योग,व्यवसाय,धंदा
आणि नोकरीतसुद्धा याचा अभ्यास करावा लागतो. प्राधान्य आणि संधीचा सुयोग्य वापर साधुन
सामाजिक समतोल साधणे हा एक मुख्य हेतु आहे. सेवा,उत्पादनाच्या निर्मीती,वितरण,वापर
याची आवश्यक गरजांची सांगड घालणे आणि पर्यायाने उन्नती साधणे. याचे अनेक 1) मॅक्रो
2) मायक्रो 3) माणसांची वर्तुणुक 4) आंतरराष्ट्रिय 5) राजकिय आणि सामाजिक असे अनेक
पैलुंचा विचार करावा लागतो. भारताचा विचार केल्यास लोकसंख्या, अज्ञान,उपलब्ध साधने
आणि मानसिकता याचाही विचार करावा लागतो.
आता तुम्ही म्हणाल, इथे अध्यात्माचा काय संबंध?
शासनही आर्थिक सुधारणा करताना,समान संधी निर्माण करणे, सार्वजनिक वितरण व्यवस्था
,मोफत वैद्यकिय सुविधा,रस्ते बांधणी,सहकार,बचत गट,मेट्रो,लोकल,एस.टी. अशा अनेक मार्गाने
अप्रत्यक्षरित्या सामाजिक विकास,समानता साधण्याचा प्रयत्न करित असते. संविधानात
अपेक्षित असलेली समानता आणि संधी निर्माण करणे हेही एक महत्वाचे ठरते. आर्थिक गरज
भागविणे, प्रोत्साहनाबरोबरच नैतिक जबाबदारीही पार पाडावी लागते. आज आपण स्वातंत्र्याची
79 वर्षात पदार्पण केले आहे. नुकसानभरपाई, संकटाच्या वेळी मदत,आपत्कालीन निधी, भविष्यनिर्वाह
निधी,निवृत्तीवेतन अशा अनेक प्रकारे मदत(लोककल्याण) केली जाते त्यामागे हिच
प्रेरणा असते. स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीतही वाढ होत असते. अध्यात्म काय सांगते?
अधिकचा हव्यास नको, अंथरुण बघुन पाय पसरा,काटकसर करा, गरजा मर्यादित ठेवा, खर्च
कमी करा,उत्पन्न वाढवा, बचत करा,आरोग्य सांभाळा, विमा काढुन जीवन संरक्षित करा. ज्याला
अध्यात्म कळले त्याला जीवन कळले असे म्हणता येईल.
कर-आकारणी करुन वेगवेगळ्या योजनेचा फायदा गरिबांना
करुन देता येतो. आपल्याकडे जी साधनसामुग्री, कौशल्य उपलब्ध आहेत त्याचा कसा वापर
करुन घेता येईल याचाही विचार केला पाहिजे. संहिष्णुता/माणुसकिच्या दृष्टिने
बघितल्यास ते योग्यच आहे. संपत्तीचे न्याय वाटप न झाल्यास गुन्हेगारी, घातपात,चोरी,फसवणुकीत
वाढ होण्याची शक्यता आहे. श्रीमंतांपासुन गरिबापर्यंत सगळ्यांनाच पैसा हवा असतो पण
तो मिळवायचा कसा? आणि मिळाल्यावर त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करावयाचा हा कळीचा
मुद्दा असतो. व्यावहारिक दृष्टिकोन आणि प्रगती हे दोन्ही साध्य करणे लहान वयातच
शिकविले पाहिजे. याउलट आपण शक्यतो मुलांना पैसे,संपत्ती, देणी/दायित्वाबाबत मोठे
होईपर्यंत ( शक्यतो कमवायला लागेपर्यंत) तरी कल्पना देत नाही. खरे पाहता हे प्राथमिक
शिक्षण देणे गरजेचे आहे. दळणवळण, गावाकडुन शहराकडे येण्याचा, शहरातुन परदेशी
जाण्याचा हेतु आर्थिक उन्नती,उच्च-शिक्षण घेणे हाही असतो. त्याचाही परिणाम
अर्थव्यवस्थेवर होत असतो. जगात आपली अर्थव्यवस्था 4 थ्या क्रमांकावर पोहोचली आहे
असे म्हणतात. त्याचबरोबर सामाजिक समताही अपेक्षित असते. ते झाले का पाहणे हा एक
आध्यात्मिक दृष्टिकोण असु शकतो. कंपनीच्या नफ्यातला 30% हिस्सा( csr) सामाजिक
हेतुने वापरणे, प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातला 10 ते 30 % वाटा बाजुला काढुन त्याचा
विनियोग समाजासाठी करणे हाही सामाजिक व अध्यात्मिक हेतुच असावा. गरजुंना मदत करणे,
माणुसकिच्या नात्याने वागवणे हेही एक कर्तव्यच म्हणता येईल.
आपले साधु-संत
वेळोवेळी हेच सांगुन स्वत:ही तसेच वागत असतात.“जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे
आपुले”ही अध्यात्माचीच शिकवण आहे. सर्वसामन्यांनाचे राहणिमान उंचावणे,
रोटी,कपडा,मकान आणि आता शिक्षण ही मुलभुत गरज भागणे आणि भागविणे हे प्रत्येकाचेच परम
कर्तव्य असते. सामाजिक संस्था, विश्वस्त मंडळी, देवस्थानामार्फत त्यासाठी मदत केली
जाते. तसेच लोकांनीही स्वत: त्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. सगळे फुकट मिळविण्याचे
प्रयत्न सोडुन देणे, गरज असेल तेव्हा नक्किच फायदा घ्यावा पण नसताना शक्यतो टाळणेच
बरे असते. फुकट काही मिळत नसते,एकाच्या खात्यातुन काढुन दुस-याला देणे एवढेच केले
जाते. त्यासाठी किंमतीही वाढविल्या जातात पर्यायाने महागाई वाढते, हे चक्र चालुच
राह्ते.” गरिबी हटाओ” अशी 1975 पासुन आपण वल्गना करित आहोत पण खरिच हटली का? कि स्वरुप
बदलले ? मागण्या तशाच आहेत,माणसे वाढलीत. साधने कमीच पडतात, गरजा संपतच नसतात त्या
कुठेतरी,केव्हातरी संपवाव्या लागतात. मदत देणे म्हणजे त्याला पंगु/लाचार बनविणे
नव्हे,तुला मिळाली,आता तु तशी मदत दुस-याला करण्याएवढा “सक्षम हो” अशी त्यात
अपेक्षा असली पाहीजे. आळशीपणास खतपाणी घातले असे व्हायला नको. तुम्हाला काय वाटते?
पैशासाठी वाट्टेल ते करणारे बघितले कि, कधी
कधी भिती वाटते,त्याचा गैरफायदाही ब-याचवेळा
घेतला जातो. ते टाळण्यासाठीच हा अभ्यास आणि तसे प्रयत्न केले
पाहिजेत. आर्थिकशास्त्र आणि व्यवसायांना त्यांच्या नैतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांचे
समाधान करण्यासाठी अधिक आध्यात्मिक मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे. परदेशातही ह्या
गीतेतल्या(spiritual economics) तत्वज्ञानाची आवड निर्माण झालेली दिसुन येते. हा दृष्टिकोन आर्थिक आचारसंहिता,
आंतरिक प्रेरणा, नैतिक जागरूकता, दिर्घ-काळ आणि सीमा पुनर्स्थापित करण्याचा उद्देश
ठेवतो.
Comments
Post a Comment