ॲट@ गुलझार-ए-गझल
नुकतीच गुलझार साहेबांची 90 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या अनेक कलाकृतींचा बोलबाला/आढावा घेतला गेला. एका कवीचे एवढे रसिक, चाहते आणि समीक्षकांनी केलेले कौतुक बघुन खुप छान वाटले. माझेही आवडते शायर, गीतकार,दिग्दर्षक आणि निर्माते असे हे व्यक्तिमत्व एकदम साधे आणि बहुआयाम असुन अगदी तरुण पिढिचेही ते आदर्ष आहेत. माझ्या आधीच्या पिढिचे असुनही त्यांनी सगळ्यांनाच त्यांच्या गझल गाण्यांनी,चित्रपटांनी आणि उमदे व्यक्तिमत्वामुळे प्रसिद्ध झाले.
मराठीत गझल म्हणजे एक प्रकारे भावगीतच म्हणावयास
हवे. आपल्याकडे सुरेश भट, भाऊसाहेब पाटणकर,भीमराव पांचाळे आणि आताचे गुरु ठाकुर यांची
या क्षेत्रातली कामगिरी उल्लेखनीय आहे. उर्दुतली कविता/शायरी म्हणुन आपण जरी ओळखत असलो
तरी मुळ उगमस्थान पर्शियन लोकांची ही कला असे म्हणावे लागेल. प्रेम,जीवनावरची आसक्ती
आणि अध्यात्म असा मुळ गाभा असलेली ही कविता/नग्म/शेरो-शायरित कधी मैफिलीत दाद मिळवुन
जाते तर कधी वास्तवाची जाणीव करुन देते. कमी शब्दांत कुप काही मतिथार्त सांगुन कविला
व्यक्त करणारी हा आत्मिक आविष्कार असेच म्हणावे लागेल. त्यासाठी लागणारी दैवी प्रतिभा,
निरिक्षण आणि भाव-भावनांचे अचुक निवेदन असे गुण असावे लागतात. आशय,आशा-निराशा,तत्वज्ञान
आणि भावनांचे मिश्रण सांगणारी गझल उभे आयुष्य कधी कधी उजळुन टाकते. ही मानवी मनाची
भुक आहे, ओलावा आणि दु:खावर फुंकर घालणारी ही गझल मनाला भडते. काही उदाहरण सांगते त्यावरून
तुम्हाला कळेल.
1) इश्कने
निकम्मा कर दिया
वर्ना हम भी थे काम के!!
-इती मिर्ज़ा गालिब
2)
मश्वरा तो खुप देते हो कि खुश रहा करो
कभी खुश रहने की वजह भी दे दिया करो !!
-इती गुलझार
3) काय समजायचे ते शेवटी समजुन गेलो
मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळुन गेलो !!
-इति सुरेश भट
4) जखमा कशा झाल्या सुगंधी…
झाल्यात काळजाला,
केलेत वार ज्यांनी तो मोगरा असावा.
-भीम राव पांचाळे
5) आयुष्य वाहते म्हणुनी बैचेन का उगा व्हावे
ओंजळित येईल तितके
आपले धरुन चालावे.
-इती गुरु ठाकुर
अजुनही बरेच जण आहेत, जगजित, चित्रा सिंग, गुलाम अली, तलत अझिझ, बेगम अख्तर,पीनाझ मसानी,मेहंदी हसन इ… गझल सामान्य माणसांपर्यंत पोहोचविणे हे गैर फिल्मी गीतातुन,मैफिलितुन,चित्रपट गाण्यांतुन आणि पार्श्वसंगीत म्हणुन बेमालुमपणे मिसळल्या जातात. कित्येक गाण्यातुन आपण हे अनुभवतो. बझार,उम्राव जान,इजाजत किंवा आताचा दम लगाके हैशा असे अनेक चित्रपट केवळ गाण्यातील अर्थांमुळे प्रसिद्ध अगदी पारितोषिक प्राप्तसुद्धा ठरतात. गझल गाण्याचा अनुभवही तेवढाच गायकाला व श्रोत्यांना अंतर्मुख करायला लावतो.यातुन लोकांना समाधान,आनंद आणि सहवेदना जाणवते आणि ते तृप्त होतात.
कित्येक शब्द त्यातिल आपल्याला कळतच नाहित तरी काही फरक पडत नाही. मतिथार्थ जाणुन आपण समजुन घेतो. मुळात उर्दु भाषा एवढी मुलायम,मार्दवयुक्त आणि अलंकारीक असते कि त्याचा मोहच पडतो,मलाही ही भाषा खुप आवडते,शिकायला आवडेल मला विशेषत: गझल समजुन घेण्यासाठी आणि आस्वाद घेण्यासाठी. गझल लिहिण्यासाठी लागणारा संयम,भाषेवरचे प्रभुत्व आणि निरिक्षण क्षमता याची कसोटी केवळ 2-4 वाक्यात व्यक्त होणे आणि ते समोरच्याला समजणे त्याच्या काळजाचा ठाव घेणे हे खरेच कठिण काम आहे. काहिजण त्यालाच वाहुन घेणारे असतात. एक प्रकारे समाजप्रबोधनाचा हेतुही सफल होतो. अशा या कलाकारांना गुलझार साहेबांच्या वाढदिवसांच्या निमित्त्याने सलाम आणि प्रणाम! असेच उत्तरोत्तर चांगल्या गझल्स लिहुन त्यांनी आम्हाला तृप्त करावे,त्यांची प्रतिभा अशीच सदैव कार्यरत राहो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.
बाय द वे, अखतरी बाई फ़ैझाबादी आणि अमीरे खुसरो हे गझलचे जनक समजले जातात. गुलझार साहेबांना “ जय हो” या गाण्यासाठी अकादमी पुरस्कार आणि ए.आर.रेहमान यांना संगीतकार म्हणुन 2 ओस्कर पुरस्कार मिळाले. पहिले गाणे 1963 मध्ये गुलझार यांचे “ मोरा गोरा रंग लैले” बंदिनीतले खुप गाजले होते.
Comments
Post a Comment