शिवकालीन रणरागिणी
रणरागिणी म्हणजे रणागंणात लढणारी शुर स्त्री,जी पराक्रम गाजवणारी,धाडसी आणि शुर असते. केवळ युद्धातच नव्हे तर समाजातील अं:धकार दुर करणे, गरजुंना मदत करणे, एखाद्या मोठ्या ध्येयासाठी समर्पितपणे कार्य करणार-या लढाई व धामधामूकीच्या कालावधीत खंबीरपणे वेळप्रसंगी स्वकिय आणि परकिय यांच्या समवेत विविध डावपेच लढवत, सहका-यांना आपलेसे करून उत्तेजन देऊन राज्यकारभार करणा-या स्त्रिलासुद्धा “रणरागिणी”असे म्हणतात. हा शब्द शिवाजी महाराजांच्या शौर्याचे वर्णन करतांना वापरला तर त्याकाळात जिजाबाई भोसले यांचा उल्लेख करणे अपरिहार्य ठरते. “शुन्यातुन विश्व निर्माण करणे”ही म्हण कदाचित त्यांचावरुनच तयार झाली असावी. त्यानंतरच्या काळात येसुबाई, ताराबाई, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी यासुद्धा रणरागिणीच ठरल्या आहेत. शिवकालिन“रण-रागिणी”हा विषय खरेच विचार करण्यासारखा आहे. जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा स्त्रीयांची उपजत लढाऊ वृत्ती दिसुन येते.
जीजाबाईंचा जन्म
12 जानेवारी 1598 रोजी आताचे विदर्भ प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड गाव येथे
झाला. त्यांच्या वडीलांचे नाव लखुजी जाधव आणि आईचे नाव महालसाबाई होते. जीजाबाईंचा
विवाह शाहजी भोसलें बरोबर झाला. त्यांनी त्यांचे पती शाहजी भोसले समवेत राजनैतिक कार्यात
भाग घेऊन त्यांना साथ दिली. जिजाबाईंना एकूण सहा मुले झाली. त्यांपैकी संभाजी व छ.
शिवाजी ही दोन मुले इतिहासात प्रसिद्ध असून वंशवर्धक ठरली. अन्य चार मुले अल्पायुषी
ठरली. शिवाजी हे जन्मापासून आईसमवेत होते. जीजाबाईंच्या मोठा मुलगा संभाजी हे त्यांचे
वडील शाहजी भोसले यांच्या समवेत रहात होते. त्यांचा मृत्यू अफजल खान समवेत झालेल्या
लढाईत झाला. शिवाजींचा जन्म जिजाबाईंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
शिवाजीराजांनी “स्वराज्याची” टिणगी त्या
काळच्या लोकांच्या मनात पेटवली आणि त्यांचे महत्व सदैव तेवढेच राहिल. अशा महान व्यक्तिमत्वाला
घडविण्यात त्यांच्या आईचा/जिजाबाईंचा मोठा वाटा आहे. तसेच आई व बाबा बनुन त्यांनी शिवाजीराजांना
घडविले. महाराजांच्या आऊसाहेब/राजमाता ह्या कणखर आणि पोलादी व्यक्तिमत्वाच्या होत्या
म्हणुन तर शिवाजीराजांएवढे उतूंग व्यक्तिमत्व अवघ्या जगाला लाभले. राजांच्या पाठीशी
तुळजाभवानीप्रमाणे उभी असलेली आई प्रसंगी कठोर, दुरदृष्टी असणारी, एकाच वेळी स्वकीय
आणि परकिय राजवटींची झुंजणारी एक रणरागिणी-दुष्टांची सहार करणारी आहे. नंतरच्या काळात
येसुबाई, ताराराणी यादेखील खंबीरपणे स्वराज्य वाचवायला आणि शत्रुंशी/मुकाबला करायला/लढायला
सक्षम झाल्या त्यासाठी जिजाबाईंची कारकिर्द ही अनुकरणीय आणि कारणीभूत ठरली आहे. यास
अनुसरून आज मी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा जिजाबाईंबद्दल, त्यांच्या कर्तत्वाबद्दल लिहिणार
आहे. रणरागिणीने प्रत्यक्ष युद्धात भाग घ्यावयासच पाहिजे असे नाही मात्र राज्याची घडी
युक्ती, प्रवृत्तीने आणि निडर राहून नीट बसविणे हेही एक आव्हानच असते. प्रस्तावित कार्यपध्दतीच्या
विरोधात उभे राहणे,स्वत:च्या मुलाला, नातवाला त्यासाठी तयार करणे. मुळात हे ध्येय लोकांच्या
मनात निर्माण करणे आणि त्याची अंमलबजावणी करवुन घेणे हे काम जास्त महत्वाचे नाही का?
जिजाबाईंनी मनोविकास आणि व्यक्तिमत्वात हवा तो
बदल घडवुन आणला. त्यांना योग्य माणसाकरवी लढाई आणि राजकारणाचे प्रशिक्षण दिले. त्यासाठी
लागणारे मनुष्यबळ, सहकारी पारखणारी नजर दिली. शस्त्र,लढाईचे आणि युक्तीचे प्रशिक्षण दिले आणि राज्यकारभाराचे धडे दिले. हे
धडे बालशिवाजींना पुढे मार्गदर्शनाचे आणि प्रेरणेचे ठरले. शिवाजी महाराजांच्या बालपणी
रामायण, महाभारत तसेच शुर-विरांच्या अनेक गोष्टी सांगुन त्यांच्यात हिंदू धर्म रक्षणाचे
बीज रोवले. त्याचाच एक परिणाम म्हणजे शिवाजी महाराजांनी वयाच्या 17 व्या वर्षी कोंडाणा
किल्ला जिंकून घेऊन हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.
राजांना जरूर
तेथे सल्ले देणे. नाराज/ हताश झाल्यास पुन्हा जिंकण्यासाठी प्रेरित करणे. आग्र्याची
सुटका, अफझलखानाचा वध, पुरंदर, कोंडाणा, सिंहगढ जिंकणे या प्रसंगात जीजाबाईंची मोठी भूमिका होती. राज्य मोठे होत असताना
तेवढी संकटेही मोठी येत होती परंतु प्रत्येकवेळी विवेकाने, प्रसंगी माघार घेऊन आपले
ईप्त्सित कसे साध्य करुन घ्यायचे हे बाळकडु राजांनी आईकडुनच घेतले होते. राजांची सोयरीक
वेगवेगळ्या सरदार-वतनदारांशी करुन त्यांनी एकप्रकारे जनतेला विश्वासच दिला की सामान्य
घरातली मुलगीसुद्धा राणी होऊन राजांचा भार पेलू शकते. जिजाबाई या अत्यंत हुशार आणि
बुध्दीमान स्त्री होत्या. शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील अटकेच्या वेळी त्यांनी राज्याची
व्यवस्था उत्तमपणे राखली यात त्यांचे मोठे कौशल्य दिसून येते. त्यांनी स्त्रीयांवर
अन्याय होण्यास दिले नाही याचेच बालकडू शिवाजी महाराजांना मिळाले होते म्हणुन तर कल्याणची
सुभेदाराची सुन मानाने परत जाऊ शकली.
जीजाबाईंनी सर्वत्र पातशाही,आदिलशाही, मोगलशाहीचे
वर्चस्व असताना आपला पुत्र शिवाजी महाराजाच्या हस्ते हिंदवी स्वराज्य स्थापनेस मोठा
हातभार लावला. त्याचे फळ त्याकाळच्या पिढ्यांना, नंतरच्या अनेक पिढ्यांना मिळाले आणि
मराठा साम्राज्याचा उदय झाला. त्याची फळे आपण आज आणि पुढेही भोगणार आहोत. या महान राजमातेने शिवाजीराजांना “राज्याभिषेक”
झालेला बघुन 12 दिवसांनी रायगड जवळील पाचाड गावात दि. 17 जून 1974 रोजी समाधानाने डोळे
मिटले.
बाय द वे,
आपण केवळ कॉलेज,उद्यानाला नावे देऊन जीजाबाईंची आठवण ठेवणे अपेक्षित नसुन त्यांचे गुण अपेक्षित आहेत. तशी पिढी घडविणे
हे एक मोठे आवाहन आतांच्या मातांपुढे आहे. हे आवाहन नक्किच सगळ्या मुली,महिला मनावर
घेऊन तसे प्रेयत्न करतील ही अपेक्षा आणि प्रार्थना.
Comments
Post a Comment