आनंदाचे झाड

               आनंदाचे झाड” ही कल्पनाच किती छान आहे ना! कोणतेही झाड आपल्याला आनंदच देत असते. नि:स्वार्थ जगणे हे माणसाने झाडाकडुनच शिकावे. माझ्या आयुष्यात तशी आनंद देणारी अनेक झाडे येऊन गेली. सगळ्यांचा उल्लेख करणे शक्य नाही मात्र या माणसांमुळेच माझे जगणे समृद्ध झाले हे नक्किच आणि त्यासाठी परमेश्वराची कृपाच आहे असे म्हणावे लागेल. त्यातल्या त्यात जवळचा उल्लेख करावयाचा झाल्यास आमच्याच घरातले काका,काकु आणि आता भाऊ-वहिनी यांचा करावा लागेल. काका-काकुंचा सहवास तसा 19 आणि 23 वर्षेच लाभला पण भाऊ आणि वहिनींचा गेली 50-55 वर्षे लाभत आहे.  

            एक डॉक्टर आणि एक भाऊ म्हणुन अत्यंत शांत स्वभाव, मनमिळावु तसेच त्याच्या वागण्यातुन आदरयुक्त मोठेपणा जाणवतो. मुख्य म्हणजे त्यांनी खेड्यात प्रॅक्टिस करण्याचा वडिलांचा वारसा सार्थपणे पुढच्या पिढीलाही सोपवला हे जास्त कौतुकास्पद वाटते. त्याला साथ देणारी वहिनीही तशीच शिस्तीची आणि मनमिळावु आहे आणि दोघांनीही गेली 40 वर्षे रुग्णसेवेला सतत वाहुन घेतलेले आहे. पेणसारखे (आधी पोयनाड गावातुन सुरुवात)सुसज्ज दवाखाना उभारणे तसे सोपे काम नव्हते. अनेक अडचणी आल्या, प्रसंगी लोकांचा रोषही पत्करावा लागला. केवळ त्याग आणि रुग्णसेवा हे समाजहित न कंटाळता करणे,मुलांनाही तसेच तयार करणे,त्यांनीही (मुलगा,मुलगी व सुन)साथ देणे तेवढेच महत्वाचे आहे. कुटुंबात,नातेवाईकांत तर ते लोकप्रिय आहेतच पण गावात मित्रमंडळितही प्रसिद्ध आहेत. वेगवेगळे उपक्रम त्यांच्या दवाखान्यामार्फत राबविले जातात ते आता इथे सांगणे योग्य होणार नाही. दुस-यांना आनंद/समाधान देणे हे प्रामुख्याने होत असल्यामुळेच हा एक नोबल व्यवसाय गणला जातो. आताच्या अनेक गैर-व्यवहाराच्या जगात असे डॉक्टर मिळणे आणि प्रत्येक पिढिने ते पुढे नेणे हे एक आदर्श कर्तव्यच म्हणावे लागेल आणि तेही एक आनंदच निर्माण करते.

          पिढीजात व्यवसाय सांभाळणारे अनेकजण असतात पण तीच कष्टाळु वृत्ती,सेवाभावी आणि अर्ध्या रात्रीपण रुग्णांसाठी धावुन जाणे सलग 100 वर्षे( 3 पिढ्या) जपणे हे क्वचितच आढळेल. व्याधीमुक्त करणे हे प्रत्येक डॉक्टरचे कर्तव्यच असते असे तुम्ही म्हणाल. तेही हसतमुखाने करणे,वैयक्तिक स्वार्थ न बाळगता उपचार उपलब्ध करुन देणे,आधुनिक उपचारांसाठी लोकांना लांब जावे लागु नये, (पुर्वी पनवेल किंवा मुंबईशिवाय उपाय नव्हता.) अशा अनेक सेवा त्यांच्यामार्फत पुरविल्या जातात. मुलगा सुन आणि मुलिने उच्च शिक्षण व तंत्रज्ञान आत्मसात करुन त्यात भरच घालत आहेत.

          अशा या आनंदाच्या झाडाला रक्षाबंधनानिमित्त “ सदा बहरत राहो,निरोगी आणि दिर्घायु ठरो”ही सदिच्छा आणि परमेश्वर चरणी प्रार्थना. आपणही कायम डॉक्टरांप्रती कृतज्ञ राहुन शक्यतो त्यांना सहकार्य करुन तब्येत सांभाळावी. आपल्यात असलेल्या आनंदाच्या झाडाला खतपाणी घालुन आनंदी राहावे  ही विशेष विनंती.सोबत त्यांचा फोटो जोडत आहे.


 


Comments

  1. Wa! What a true salutation you HV given to our noble brother Nanu.I always think about his qualities in my mind but never had guts to express in words.Yiu hv done it my dear.Heartfelt thanks to you!

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyawad 🙏 Madhuri Tai!👍

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव