शिवकालीन रणरागिणी—भाग-3, ताराराणी (मोहिते) भोसले- मोगलमर्दीनी ,महाराणी भद्रकाली,स्वराज्यसौदामिनी.

               अनंत लिबीले लिखीत कादंबरी वाचनात आणि तिस-या रण रागिणीचा “ताराराणी भोसले” यांचा परिचय झाला. अनायसे नवरात्रही चालू आहे. देवीचा उत्सव,महिला हौशी,कर्तबगार,सोशिक तशाच रणरागिणीसुद्धा असतात. अशा अनेक महिलांचा परिचय इतिहास आपल्याला करुन देत असतो किंबहुना अशा महिलांमुळेच इतिहास घडतो. याचाच अर्थ इतिहास घडविण्याइतकी ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच फक्त ती काल व परिस्थितीनुरुप प्रकट होते इतकेच. अशा या दुर्गेचा परिचय काय आहे बघुया.

             तारा ही सरसेनापती हंबीरराव मोहितेंची कन्या, शिवाजीमहाराजांची सुन आणि छत्रपती राजारामाची पत्नी होय. लहानपणापासुनच शिवाजीमहाराजांचे पराक्रम आणि युध्द कौशल्याबाबत वडिलांकडुन ऐकतच मोठी झालेली आणि खंबीर मनोवृत्तीला यामुळे खतपाणीच घातले गेले. ताराराणीला तलवारबाजी,धनुर्विद्या,घोडदळ, लष्करी छावणी रणनिती, मुत्सुद्देगिरीबाबतचे बाळकडू लहानपणापासुनच वडिलांकडुन मिळाले. राजारामांसाठी जेव्हा शंभुराजेंनी ताराऊला हंबीररावांकडे मागणी घातली तेव्हा आश्चर्य,अभिमान आणि आदरांमुळे त्यांनी लगेच होकार दिला. खरे तर, सोयराबाईंचे भाऊ म्हणुन त्यांना मान होताच,सरसेनापती आणि भावी व्याही म्हणुन त्यांना या गोष्टींचा आदरच वाटला. अष्टप्रधानांपैकी जास्त अनुभवी (युद्धभुमीवर पराक्रम गाजविणारे) जेव्हा शिवाजीराजांचे निधन झाले तेव्हा संभाजीचा पक्ष उचलुन धरणारे एकमेव हंबीरराव मोहिते यांची मुलगी शिवाजीराजांची भावी सुन म्हणुन निवड किती योग्य होती हे स्वत:च्या पराक्रमाने ताराऊने दाखवुन दिलेच.

               संभाजींच्या निधनानंतर तर स्वराज्य नेतृत्वहिन झाले असे वाटुन मोघलांनी स्वराज्यावर स्वारी केली. तेव्हा स्वराज्य आणि स्वराज्याचा वारस जगावा म्हणुन येसुबाईंनी रामराजे व ताराराणी यांना साता-याला सुरक्षितपणे काही सरदारांबरोबर पाठवुन दिले होते व स्वत: कैद पत्करली होती. वृत्तीने भोळे व पटकन विश्वास ठेवणारे राजारांम त्यामुळे एकटे पडले आणि नको त्या वातावरणात वाहत जाऊ लागले तेव्हा त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी ताराबाईंना खंबीर व्हावेच लागले. रामराजांना दौलतीचे महत्व पटवुन देऊन, सैंन्यात होणारी नाराजी/दुफळीला वेळीच आवर घालणे, स्वतंत्र राजगादी (पन्हाळा जिंकुन) तयार करणे, तिची राजधानी कोल्हापुर करणे, अंतर्गत आणि बाह्य आघाडीवर धडाडिने निर्णय घेणे अशा अनेक स्तरावर त्यांचे नेतृत्व मार्गदर्शक आणि साहसी वृत्ती आढळुन येते.

             स्वराज्य सौदामिनी जिने “औरंगजेबाची कबर खोदली”असाही उल्लेख आढळतो. एवढ्या बलाढ्य स्वराज्याच्या शत्रुशी सलग 8 वर्षे सामना करणे खरेच कठिण गेले असणार. 1675 ते 1761 पर्यंतचा हा कालावधी मात्र ताराबाई मराठी साम्राज्याच्या उर्ध्वूयू होत्या. तसेच स्वराज्याचे स्वप्न जीवंत ठेवण्यासाठीचे त्यांचे योगदान मोलाचे ठरले. मराठेशाहीतील मुत्सुद्यांना काळाचे गांभिर्य  समजावुन शेवटपर्यंत एकजुटीने शत्रुचा मुकाबला केला. स्वत: लष्करापुढे जाऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, खालावलेली आर्थिक स्थिती सावरली. कोल्हापुरच्या राजगादिची स्थापना करुन त्यांनी समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली. राज्याला, गादीला आणि समाजाला खंबीर नेतृत्व देऊन सर्वांचे नितीधैर्य टिकवुन ठेवले. मराठ्यांमध्ये फुट पाडण्यासाठी संभाजीचा मुलगा शाहु ( प्रथम) आणि ताराराणी यांच्यात युद्धही झाले. त्यात मात्र ताराबाईचा पराभव होऊन तिला माघार घ्यावी लागली. वयाच्या 86 व्या वर्षी सिंहगडावर ताराबाईंचे निधन झाले. ताराबाईंच्या  कर्तत्वावरुन एक रणरागिणी काय काय आणि कसे करु शकते हे आपल्याला नक्किच कळले असेल.                                        

                               “ रामराणी भद्रकाली !रणरंगी कृद्ध झाली!

                                  प्रलयाची वेळ आली ! मुगलहो सांभाळा”

                जिचे वर्णन असे केले जाते ती ताराराणी खरेच सार्थ ठरविते ना ! अशा या रणरागिणीला नवरात्रीनिमीत्त त्रिवार वंदन.    


Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव