सुरक्षा कवच भाग-2- आर्थिक स्वातंत्र्य आणि आपण

                               5 Money rules- Warren Buffet

1)    Don’t borrow money to buy luxuries.

2)    Treat credit cards like debit cards.

3)     Invest $ 20 of every $ 100 you earn.

4)    If you can’t buy it twice, you can’t afford it.

5)     Spend less than you make.

              मागच्या भागात आपण पैसा,विमा याचे महत्व बघितले. या भागात आपण आर्थिक स्वातंत्र्य, जबाबदारी आणि कर्तव्याबाबत बघुया. ब-याच वेळा आर्थिक स्वातंत्र्याबाबत वारंवार बोलले जाते पण ते कसे, केव्हा आणि कधी मिळवायचे याबाबत मात्र कोणी सांगत नाही.असे म्हणतात “पैशाला एकच भाषा कळते, ती म्हणजे “तु मला आज सांभाळ, मी तुला उद्या सांभाळतो.”स्वत: कमावलेला पैसा वापरणे, गुंतविणे आणि त्याचे प्रसरण करणे यावर पुर्णपणे नियंत्रण असणे” म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य असे म्हणता येईल. चांगल्या आर्थिक स्थितीमुळे तुमच्या आवडि-निवडी आणि  ध्येय गाठणे शक्य होते. आपण हा अधिकार योग्यरित्या बजावतो का खरा कळीचा मुद्दाआहे. लहानपणापासुन मोठ्यांचे ऐकत,बघतच आपल्याला पैशाचे महत्व कळायला लागते. पैसा कितीही प्रिय असला तरी तो कमावताना नितीमत्ता आणि माणुसकी बाळगणे हेही तितकेच महत्वाचे आहे. तसेच किती पैसे मिळाले तर आपण सुखी होवू? याची देखिल काही आराखडे असणे आपल्याकडे असणे आवश्यक आहे.

             स्त्रिया याबाबत जास्त हुशार असतात असे माझे प्रामाणिक मत आहे. घरातले आई बाबा करित असलेले आर्थिक व्यवहार बघत/सांभाळत होणारे मुले-मुली याबाबतीत लवकर सज्ञान होतात असे एक निरिक्षण सांगते. दैनंदिन/ मुलभुत गरजा भागविल्यानंतर उरलेले पैसे कसे गुंतवायचे/नियोजन करायचे हे व्यक्तीगणिक वेगवेगळे निकष असु शकतात. कोणी सोने,जमिन,घर,शेअर्स,म्युच्यअल फंड, मुदत बचतीचे पर्याय उपलब्ध असताना नक्की किती आणि कुठे हे पैसे गुंतवावेत यासाठी मार्गदर्षन,सल्ला घेऊन तसे नियोजन केले जाते. यासाठी स्वल्प,दिर्घ कालावधीही महत्वाचा असतो. याशिवाय घेतलेले कर्ज फेडणे, उज्ज्वल भविष्यासाठी खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ घालणे हेही बघावे लागते.

          मध्यंतरी सेकंड करियर म्हणुन मी विमाक्षेत्र निवडले. त्यात बहुधा स्त्रियाच जास्त आहेत आणि त्या अगदी यशस्वीरित्या व्यवसाय सांभाळत आहेत बघुन कौतुक वाटले. त्यातले पर्याय आणि विस्तारित क्षेत्रातल्या संधी वाढत आहेत. एकुण बचत आणि खर्चाचे प्रमाण लक्षात घेता प्रत्येकाने थोडी थोडी बचत केल्यास आपणच आपले पैसे आणीबाणीमध्ये वापरु शकतो. त्यासाठी पैशाचा ताण न घेता मन:शांती मिळविणे हाही एक आर्थिक स्वातंत्र्याचा फायदा होतो. तसेच खर्च निवडीचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. निवृत्ती आपणहुन कि स्वेच्छने हे केवळ त्या व्यक्तीवर अवलंबुन असावे. त्यासाठी त्याला इतरांवर अवलंबुन राहावे लागु नये एवढे जरी किमान ध्येय ठेवले तरी बरेचसे दु:ख,वेदनांवर विसर/ मात करू शकतो प्रत्येकजण.

          “पैसा मिळविणे सोपे पण तो सांभाळणे कठीण” असे आपले पुर्वज म्हणायचे ते यासाठीच. कार्ल मार्कस किंवा अमर्त्य सेन यांना अभिप्रेत असलेले आर्थिक स्वातंत्र्य मात्र समान संधी आणि समाजवादावर आधारित आहे. जे तुलनात्मकरित्या गरिब आहेत किंवा ज्यांच्या मुलभुत गरजाही भागल्या जात नाहीत त्यांना वेगवेगळ्या पध्दतीने पुढे आणणे, त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, अज्ञान गरिबी दुर करणे, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणे या सगळ्या गोष्टींसाठी शासन,सामाजिक संस्था,उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे ,मदतीचा हात देणे, अशा अनेक सामाजिक समता अभिप्रेत असते. त्यात आपण आपला खारिचा वाटा उचलणेही अपेक्षित असते. काही धर्मांमध्ये सक्तिची तशी बचत एका ठिकाणी जमा करुन त्याचे वाटप केले जाते. धार्मिक कार्याच्या वेळी दान-धर्म करण्याचा हेतू पुर्वी तोच असायचा. देवळात जे दान केले जाते त्याचाही असा सकारात्मक गोष्टींसाठी वापर झाल्यास अनेक संभाव्य धोके टाळता येतील.

          अध्यात्म आपल्याला हेच वेगळ्या पध्दतीने सांगते. हातात जेवढे मावेल तेवढेच ठेव. अतिलोभ बरा नाही, दुस-यांना मदत केल्यास किंवा आपण कोणाची मदत घेतल्यास आपणही इतरांना मदत करणे अपेक्षित असते. “देणा-यांनी देत जावे… घेणा-याचे हात घ्यावे. सुसुमाग्रजांची किती सुंदर कविता लिहिलीय आणि त्याचा भावार्थ किती छान आहे. येताना आपण खाली हात आणि जातानाही खाली हातच जातो. मग या प्रवासात कोणाचे 2 दिवस चांगले जाणे/घालविणे जर आपल्या हातात असेल तर नक्किच तसा प्रयत्न करावा. त्यासाठी फार मोठा त्याग नको करायला फक्त एकुंण उत्पन्नाच्या 1% भाग जरी अशा कामाला ठेवला तरी देशातले,समाजातले किती तरी प्रश्न सोडविले जातील. बघा विचार करा आणि ठरवा. यापेक्षा वेगळे आर्थिक स्वातंत्र्य असु शकेल?

         बाय द वे, पैसा कमविणे म्हणजे श्रीमंत होणे की समद्ध होणे का? कि समृद्ध होउन मग पैसा कमविणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तो स्वत:बरोबरच इतरांनाही समृद्धीकडे नेणारा असावा हे मात्र नक्की असावे.

                      


Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव