मनातल्या गाठी/अढी
गाठी म्हटल्या की आपल्या डोळ्यासमोर लहानपण येते. बुटाची,परकर,पोलका, फुलांची वेणी जीची चुकून निसरगाठऐवजी पक्की गाठ बसली की पंचाईत व्हायची. विशेषकरुन प्लॅस्टीकची पिशवी जानवे आणि फुलांच्या/हाराच्या गाठी सोडणे कठीण असायचे. आई किंवा आजी जेव्हा “ अग, जरा सुईमध्ये दोरा ओवुन देग म्हणायच्या तेव्हा तो सलग गाठी न घालता दोरा घालता येणे मोठे जिकिरीचे काम वाटत असे. या गाठी निर्माण झाल्या की, “सांगता येत नाही आणि सोडविता येत नाही”अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा तर अजुनच हे एक दिव्य आहे असे वाटायला लागते. कालांतराने आपण यात यशस्वी होत जातो हा भाग वेगळा किंवा प्रगल्भता म्हणा किंवा संयम वाढत जातो तसे हे सोपे होत जाते. या गाठी जर नाहीच सोडविता आल्या तर नाईलाजाने कधी पिशवी,कधी कपडा तर कधी नाडी/दोरा नाईलाजाने कापुन टाकावा लागतो हेही तितकेच खरे. काही गाठी मात्र आनंददायी असतात, जशा की,रेशीम गाठी(नवरा बायको-स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात,प्रियकर-प्रेयसी),ऋणानुबंधाच्या/मानलेल्या नात्यातुन तयार झालेल्या. रक्ताच्या, नात्यातल्या, भावबंधनातल्या, नकळत अचानक परिस्थीतीने निर्माण झालेल्या अशा अनेक सांगता येतील. काही गाठी मात्र योगायोगाने पडतात आणि त्या आनंदाच्या ठरतात.
तशाच
गाठी जर मनात/शरिरात निर्माण झाल्या तर! डॉक्टर असतातच म्हणा सोडवायला पण जेव्हा ही
गाठ ओळखु शकाल आणि त्या त्रासदायक ठरल्या नंतरच. आपण शक्यतो वैद्यकिय सल्ला /उपचार घेतोच ना ! इथेही तसेच करावे लागते, ती गाठ
कापणे किंवा ज्या अवयवात ती गाठ तयार झालीय तो अवयव काढुन टाकणे.(नाईलाजाने कधी कधी
रेडिएशनचा उपाय तात्पुरता सुचविला जातो) एकुण काय गाठी होउ न देणे हे आपल्या हातात
आहे, पण त्या झाल्याच तर काय करणार? कधी कधी हे गाठ तयार झाल्याचे कळतही नाही आणि माणुस
एकदम आपल्यातुन कायमचा निघुन जातो. आता आपण बघुया कि या गाठी होतात तरी कशा तयार? कारणे
अनेक असतात, गैरसमज,तिरस्कार, द्वेष आणि भावनिक कोंडमारा. आपण आपल्याला एक “मन”आहे
हेच विसरुन जातो त्याला जपायला पाहिजे हे तर लांबच राहिले. दुस-याला काय वाटेल याचा
विचार करणारे फार कमी लोक या जगात असतात. उलट मीच “कसा बरोबर,समोरचा कसा चुक”हे सिद्ध
करण्यात आपले अर्धे आयुष्य खर्च होते. या ओढाताणीत मन दोलायमान होते त्यावर परिणाम
होतात हे कोणी लक्षातच घेत नाही,जेव्हा लक्षात येते तेव्हा खुप उशीर झालेला असतो.
बहुधा
माझा मान-अपमान,मोठा-छोटा,माझी हिच किंमत आहे का? मोठ्यांना नेहमीच मोठेपणा आणि लहानांनी
कायम लहानांसारखेच वागले पाहिजे ही वारंवार होणारी अवास्तव अपेक्षा. मी म्हणुन सांभाळतो,मी
गेल्यावर कसे होणार? माझे सगळ्यांनी ऐकलेच पाहिजे. याचा शेवट भांडण,अबोला किंवा एकमेकांशी
संबंध न ठेवणे, काहीवेळा चुक मान्य करणे हा उपाय असतो. पिढीजात वैर मनात बाळगणारे सुद्धा असतात. क्षमा केल्यास प्रश्न निर्माणच
होत नाहीत पण कमीपणा घ्यायला कोणालाच आवडत नाही. अशा अनेक गाठी मनात साठत जातात आणि
मोठे प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी मदतीला येणारे योगा, अध्यात्म आणि सकारात्मक विचार
धावुन येतात. समोरच्यामध्ये दोष शोधुन नामोहरम करणे, टिंग़ल टवाळी करणे हा काहीजणांचा
आवडता उद्योग असतो. आपण नेहंमी चांगलेच वागावे हे शिकविले जाते पण ते अंमलात आणणारे
फार क्वचितच आढळतात. स्वभावाला औषध नसते हे मात्र खरे.
Red cross रेड क्रोस ही संस्था ही आकस्मिक आपत्ती निवारण योजनेअंतर्गत अनेक
मदत करीत असते. अग्नीसुरक्षा दल अंतर्गंत सुरक्षेसाठी गाठीचे अनेक प्रकार शिकविले जातात.
आणीबाणीच्या वेळी त्या गाठी जीव वाचविण्यासाठी उपयोगी पडणा-या असतात म्हणुन. खाण्याच्या
पदार्थातसुद्धा गाठी असतात. शेव-गाठी,बत्तासे, हलव्याचे दागिने,(गुंफलेले),पुर्वी तांदुळ,गहु
भिजवुन बारिक बारिक हाताने शेव पाडणे,(खिरिसाठी-गव्हले) हल्लिचे पास्ता, मॅगी आणि ब्रेडचे
अनेक प्रकार बघतोच आहोत. फुले,हार गजरे, सजावटीसाठी लागणा-या साहित्याच्या अनेक गाठी
दिसायला छान वाटतात. अजुन तुम्हाला काही गाठी आठवतात का? नक्की कळवा.
Comments
Post a Comment