गुंगी गुडिया ते पोलादी महिला- (माननीय माजी व महिला पंतप्रधान-श्रीमती इंदिरा गांधी)
नुकतीच मान. श्रीमती इंदिरा गांधीची 108 वी जयंती साजरी करण्यांत आली. गेल्या 50 वर्षांपुर्वीचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. वय वर्षे-8-9, साल-1972-73 असावे,रस्त्यावर आईच्या कडेवर उभी राहुन जीपमधुन येणा-या एका राजकिय झंझावाताचे प्रथम दर्षन कायम अंतरंगात कोरले गेले होते. घरात होणा-या चर्चांवरुन एवढेच कळत होते कि कोणतरी अतीमहत्वाची व्यक्ती आपल्याला आज दिसणार आहे. उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. त्या “आल्या,पाहिल्या आणि मने जिंकली”अशी अवस्था सगळ्यांचीच झाली होती. भाषण काय होते पेक्षा त्यांचे बोलणे ऐकत राहवे अशी त्यांच्या आवाजात जादू वाटे. त्यानंतर मोठेपणी त्यांचे अनेक निर्णय त्यावर होणारी उलटसुलट चर्चा एवढे काही कळत नव्हते पण त्याचा संदर्भ बघितला तर आणि आताची कॉग्रेस पक्षाची अवस्था बघितली तर आता “इंदिराबाई” हव्या होत्या असे वाटते. नंतर थोडिफार परदेशी असुनही सासुची जागा/वारसा चालविण्याचा प्रयत्न सुनबाईंनी( सोनीया गांधी)केला, राजीव गांधीनी केला. निदान नात( प्रियांका) तरी त्यांची जागा भरुन काढेल अशी अपेक्षा होती पण निराशाच पदरी आली.
स्वातंत्र्यपुर्व
काळात अत्यंत श्रीमंत घराण्यात जन्माला आलेले पंडित जवाहरलाल नेहरुंची हि लाडकी आणि
एकमेव मुलगी, वडिल पंतप्रधान झाल्यावरही त्याचा कोणताही बडेजाव न बाळगता त्यांना सतत
साथ देणे, राजकारण न बोलता समजावुन घेणे, मंत्रीपद सांभाळणे अशी राजकीय पार्श्वभुमी
लाभलेल्या श्रीमती गांधी यांना आईचे सुख फारसे मिळाले नाही तरीपण त्यांनी त्याचा कोणताही
बाऊ न करता वैयक्तिक उन्नतीसह आणि देशाला सावतंत्र्योत्तर प्रगतीसाठी तयार केले. “प्रियदर्षिनी”
नांव असलेली व लग्नानंतरची,इंदिरा गांधी, 2 मुलांची “आई”असुनही लालबहादुर शास्त्रीजींच्या
आकस्मिक निधनानंतर अचानक एवढया मोठ्या पदावर जबाबदारिने/संयमाने सत्तारुढ होणे तेही
एका महिलेच्या दृष्टीकोनातुन सोपे काम नव्हते. हे आव्हानही त्यांनी यशस्वीरित्या पार
पाडले. अजुन जास्त जगल्या असत्या तर कदाचित देशाला एक दिशादर्शक नेतृत्वाचा अधिक सहवास
आणि अनेक नवीन योजना मिळाल्या असत्या,देशाचे आणि लोकांचे दुर्दैव अजुन काय!
1966 ते 1977,1980 ते 1984 अशी एकुण 15 वर्षे त्यांनी पंतप्रधानपद भुषविले.
त्या दरम्यान 1971 चे पाकिस्तानविरोधी युद्ध करुन बांगलादेशची निर्मीती केली. अनेक
पुस्तके त्यांनी स्वत: लिहिली तसेच त्यांच्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली. त्यांच्या
व्यक्तिमत्वावर आधारित चित्रपट“आंधी“आणि “इंदु सरकार आणि आताचा “इमर्जन्सी”असे होते.
इतर अनेक मातब्बर व्यक्तिमत्वे, त्यांचा योग्य तिथे उपयोग करुन घेणे त्यांना विशेष
जमत असे. यशवंतराव चव्हाण, जन.माणेकशॉ, मोरारजी देसाई, जगजीवन राम, प्रणव मुखर्जी,
झैल सिंग, फक्रुद्दीन अली अहमेद अशा अनेकजणांनी दिलेली साथ आणि घेतलेले निर्णय कधी
कधी वादग्रस्त ठरविले गेले. जसे कि, बॅंकांचे राष्ट्रियीकरण, आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लु
स्टार. तशाच त्यांच्या काही घोषणा-गरिबी हटाओ, 20 कलमी कार्यक्रम, हरित क्रांती अशा
अनेक योजनांमुळे त्या तळा- गाळातील माणसांपर्यंत लोकप्रिय होत गेल्या. देशाच्या आर्थिकरित्या
स्वयंपुर्णतेसाठी परकिय गुंतवणुकिचे आवाहन, “लायसन्स राज”चे उच्चाटन,अणूउर्जेचे महत्व,
विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण अशा अनेक समाजवादी धोरण राबविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
पं.जवाहरलाल नेहरु यांच्या आधुनिक/स्वतंत्र भारताचे शिल्पकाराचे स्वप्नाला त्यांनी
बळकटी दिली.
1980
च्या सुरुवातीला वाढणारी अर्थव्यवस्था आणि त्यांच्या गरिबी-विरोधाबाबत मोहिम यासाठी
त्यांना “मदर इंदिरा”असेही ओळखले जात होते. याच दरम्यान पंजाब येथील वाढलेला खलिस्तानवाद / दहशतवाद संपविण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा
परिणाम त्यांच्या स्वत:वरच उलटला. (इंदिरा गांधीची हत्या करण्यांत आली.)देशाच्या सुरक्षेसाठी
घेतला गेलेला हा अत्यंत महत्वाचा व कठोर निर्णयच त्यांना “आयर्न लेडी”आणि पुढे “भारतरत्न”
किताबाच्या मानकरी ठरल्या. मा. इंदिरा गांधी यांचा 66 वर्षे वयाचा कालावधी “गुंगी गुडिया
ते आयर्न लेडि“पर्यंतचा प्रवास सगळ्यांसाठिच अत्यंत प्रेरणादायी ठरला.
इंदिरा गांधींची “निर्घृण हत्या”ही जशी देशासाठी
हानी ठरली तसाच तो एका राजकिय कारकिर्दीचा अंत झाला असे वाटते. थोडा फार प्रयत्न राजीव
गांधी आणि सोनिया गांधी यांनी नंतर केला. अजुनही तशी दुसरी व्यक्ती तयार झालेली दिसुन
येत नाही ना तसे कठोर निर्णय घेण्याचे धाडस कोणी दाखवत नाही. त्यांच्यासारखी नेतृत्वाची धडाडी दाखविणे हे आताच्या महिला व सर्वांनाच
आवाहन ठरेल. असे हे झंझावती व्याक्तिमत्व, प्रथम एक सक्षम महिला, धाडसी पत्नी,( लवकरच पतीचे निधन) स्वप्नाळु मुलगी,(आदर्ष
वडिल/गुरु-जवाहरलाल नेहरुंचे निधन) खंबीर माता(,कर्त्या सवरत्या मुलाचे( संजय गांधी)
निधन)कोलमडू शकली असती पण त्यांनी वैयक्तिक दु:ख बाजुला ठेऊन स्वत:ला राजकारणात झोकुन
दिले. कायम एकच ध्यास देश “पुढे” गेला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक धोरण,योजनांचे,कृती,
वागणे, बोलणे(भाषण) याचा अभ्यास केला गेला पाहिजे. ग्रामीण,आर्थिक, भावनिक व राजकिय
तसेच जागतिक पातळीवरच्या नेतृत्वासाठी त्यांना खरोखरच मानाचा मुजरा केला पाहिजे. त्यांचे
प्रसिद्ध विचार सर्वच पातळीवर आजही तेवढेच अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहेत.
“मी दिर्घ
आयुष्य जगले याचा मला अभिमान आहे. मी माझे संपुर्ण आयुष्य लोकांच्या सेवेत घालवले.
मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करित राहिन आणि जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा
प्रत्येक थेंब भारत बळकट करेल.”
Comments
Post a Comment