आकर्षणाचा सिद्धांत

                  दिनेश खत्री आणि इंदु खत्री लिखित नुकतेच “ आकर्षणाचा सिद्धांत” हे पुस्तक वाचण्यात आले. एकुण 17 प्रकरणांतुन पुस्तक उलगडत जाते. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला समजावले जाते. त्यातील काही विचार करुन अंमलात आणण्यासारखे काही मुद्दे मुद्दाम लिहित आहे. ते शिर्षक वाचल्यावरसुद्धा आपल्या लक्षात येईल.

1)    भावना,विचार,विश्वास आणि कृती- यांचा समन्वय.

2)    अनुबंध,पैसा,व्यवसाय,आरोग्य आणि तुमच्या ईच्छांचे साकारीकरण

3)    अमर्याद असलेल्या उर्जेचा/क्षमतेचा वापर कसा करावा.

4)    जे जे हवे ते मिळु शकेल फक्त योग्य दिशा आणि ,मार्गदर्शन हवे.

5)    कालची जादु हे आजचे विज्ञान तर आजची जादु उद्याचे विज्ञान.

6)    उर्जा नष्ट होत नाही,निर्माण करता येत नाही पण वळविता येते.

7)    भगवदगीता आणि आकर्षणाचा सिद्धांत.

8)    उर्जेचा स्त्रोत माझ्यात आहे तर मी देव आहे.

9)    जन्म मरण हे फक्त देहाला लागु आहे आत्म्याला नाही.

10)    दोन विरुद्ध गोष्टीत आकर्षण असते तसेच सारख्याही गोष्टींत असते.

11)    कंपनेचे  ( फ़्रिक्वेन्सी) दोन प्रकार- धन आणि ऋण जी सकारात्मक आणि नकारात्मक स्वरुपात असते.

12)    मित्र, उत्पन्न,अडचणी,परस्परसंबंध या कंपनतेवरच अवलंबुन असतात.

13)    मीच मला जबाबदार आहे,इतर कुणी नाही.”तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकारासारखे.”-वामन्राव पै.

14)    मन,-हदय आणि शरिरातुनही कंपने वाहत असतात,त्या तिघांचा आपसमेळ हवा.

15)    अनुभव, परिस्थीति आणि लोकांना योग्यवेळि आकर्षित करणे.

16)    नर -मादी, संधी -आव्हाने,ग्राहक -विक्रेता हे परस्पर विरोधी असले तरी एकमेकांशिवाय अपुर्ण आहोत याची जाणीव असणे.

17)    विरोध थांबवा, कृतज्ञ राहा.

               अशा या पुस्तकाचा परिचय सांगता येईल. सोबत त्यांनी हेलन केलर पासुन आताच्या अमिताभ बच्चन पर्यंतची उदाहरणे देऊन पटवुन दिलेले आहेत प्रत्येक मुद्दे. खरेच हे पुस्तक संग्रही ठेऊन परत परत वाचावे असे आहे. 216 पानांचे हे पुस्तक जगण्याचे सारशिकविते. अशी पुस्तके जगण्याचा आयाम दाखवितेच त्याचबरोबर कसे वागावे हेही शिकवते. सकारात्मक विचारांची मशागत करते.आकर्षणाचा नियम हेच सांगतो,कि जे तुम्हाला हवे आहे ते देव द्यायला तयार आहे फक्त ते तुला का पाहिजे,कशासाठी आणि किती पाहीजे याची संपुर्ण कल्पना मागणा-यास हवी. ती जर मागणी मनापासुन असेल तर ती पुर्ण झालीच/होणारच हा विश्वासही सोबत असायला हवा. नाहितर आजारी माणुस सारखे मी आजारी आहे, गरिब माणुस सारखा मी गरीब आहे,अडाणी माणुस सारखा मी अडाणीच आहे असे म्हणत बसला तर तेही आकर्षित हौऊन प्रगती/सुधारणा होणार कशी? पुर्वी लोक म्हणायचे,चांगले बोला,वागा,शीकुन मोठे व्हा,श्रीमंत व्हा,समृद्ध व्हा असे आशिर्वाद द्यायला पण आपल्याला मोठी लोक नको असतात. मग आपण एकटेच सगळे ठरविणार का? नाही त्यासाठी प्रयत्न,परिस्थीति आणि ईच्छा यांची सोबत हवी. त्याशिवाय यश कसे मिळणार? लता मंगेशकर, इंदिरा गांधी,सचिन तेंडुलकर,माधुरी दिक्षित या व्यक्ती आपोआप तयार झाल्या कि प्रत्यक्ष स्वर्गातुन अवतरल्या? काही त्यांना काहीच कष्ट करावे लागले नाहीत?

           “पुस्तकी किडे” असणारी माणसेसूद्धा हल्ली पुस्तके हातात घेत नाहीत. तसे सामाजिक माध्यमावरही बरेच लेखन वाचण्यासारखे असते पण कोणी वाचत नाही.बरे,चांगले काही दिसले की इतरांनाही सांगावे असे का वाटत नाही हा मला नेहमी प्रश्न पडतो. किंवा काही चांगले वाटले तर दाद पण द्यावीशी वाटत नाही एवढे आपण भावनाहीन, वाचन कृतघ्न झालोत की होणार आहोत? हल्ली सगळे काही ओनलाईन मिळते हे एक अज्ञान असते. स्वत: अनुभव घेऊन,वाचनानंद घेणे यासारखे समाधान मस्त ना! त्याची जाहीरात पण केली जाते. 8 दिवस एक पुस्तक वाचायला लागतात ना आम्ही 8 मिनीटांत ते वाचुन दाखवितो. 1-2 पुस्तके ऐकण्याचा प्रयत्नही मी करुन बघितला पण मला ते रटाळ,एकसुरी आणि एकदमच त्रोटक वाटले. मलाही वाचायला हल्ली वेळ लागतो पण मी सावकाश वाचते. कुठे पुर्वीसारखी घाई आहे? सेवानिवृत्ती त्यासाठीच तर असते असे माझे आपले प्रामाणिक मत आहे. आता काहीजण म्हणतील या वयात वाचुन कोणते दिवे लावणार आहात? उलट आताच अशा पुस्तकांची गरज आहे. तरुणपणात नक्कीच फरक पडला असता पण अजुनही वेळ गेली नाही. उर्वरीत आयुष्य तरी सुखात जाण्यासाठी असे मध्ये मध्ये वाचत राहवे असे मला वाटते. पाहिजे तर एक पान वाचा, एक प्रकरण वाचा. ज्याचा त्याचा दृष्टिकोण अजुन काय ! बघा तुम्हालाही वेळ काढुन  स्वत:च्या आवडिचे वाचायला आवडते का?     

                                     




Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव