चौथी अमेरिकन वारी- मुलिचे/सुनेचे बाळंतपण (16-1-2026 ते 24-5-2026-130 दिवस)
याआधीचे तिन्ही अमेरिकन वारिचे लेख तुम्ही वाचले असतीलच. 2025 मध्ये लेकिने आनंदाची बातमी देऊन माझी/आमची पदोन्नती झाली”आजी होण्याची.”आता “आईची-आई”अशी दुहेरी भुमिका साकारायची होती. बातमी कळल्यापासुन आनंद, काळजी, चिंता, जबाबदारी, सुख अशा संमिश्र भावना मनात होत्या. तरी ऑक्टोबर-पासुन सासुबाई तिकडे आधीच गेल्यामुळे थोडी चिंता कमी झाली होती. त्यांनी मला दिलासा दिला,”काही काळजी करु नका होईल सगळे व्यवस्थित,आपण आहोत ना!”मला तेवढेच समाधान वाटले.
2018 ला जेव्हा लेक अमेरिकेला गेली तेव्हाच एकप्रकारे ती तिथली {अमेरिकन} सुन झालेली होती,खरी सुन 2024 मध्ये झाली. आता “सारख्या सुचना”(सासु)आणि“सुचना नको”{सुन} अशा अर्थाने हे मी शिर्षक दिलेले आहे. याशिवाय सासुबाईंनीच ख-र्या अर्थाने तिचे बाळंतपण केले असे म्हणता येईल कारण तोच काळ महत्वाचा होता.लेक,जावई,लेकिचे सासु-सासरे,माझा नवरा,नातेवाईक यांना डिसेंबर-26 पासुन “बातमीचे” वेध लागलेले होतेच. 3 जानेवारी (इकडे),तिकडे 2 जानेवारिचा सोनियाचा दिन उजाडला आणि आमचे बाळराजे “चि.ईशान” प्रकट झाले/जन्मले. तरी सगळे काही व्यवस्थित {नॉर्मल बाळंतपण आणि गुटगुटित बाळ}बघुन जीव भांड्यात पडला. सध्या फोटो/विडिओवरुनच समाधान मानावे लागणार होते कारण मी 16 तारखेला जाणार होते. तोपर्यंत बाळाची मावशी, बाबा,आजी-आजोबा सेवेला हजर होतेच.
मी 16 तारखेला पोहोचल्यानंतर
19 तारखेला घरगुती स्वरुपातच बारसे झाले. लगेच 20 तारखेला ते आजी-आजोबा परत आले.
21 तारखेपासुन आजी म्हणुन माझी डयुटी ख-र्या
अर्थाने सुरू झाली. मुलांनी आणि सासुबाईंनी 3 महिने आधीच सगळी जय्यत तयारी
करुन ठेवलेली असल्यामुळे मला फारसे काही करावे लागले नाही. फक्त वेळच्यावेळी मुलीचे
खाणे-पिणे आणि बाळाला सांभाळणे एवढेच. विशेष म्हणजे 14 दिवसांची बाळंतीण मला एअर-पोर्टवर
न्यायला आलेली बघुन आश्चर्यच वाटले. तिकडे इथल्या सारखे लाड करायची सवय त्या मुलांनाही आणि
मुलींनाही नसते. सगळे काही व्यवस्थित, स्वच्छ आणि पटापट करणे,त्यांना सवयच असते त्याची.
डॉक्टरकडेसुद्धा स्वत:च गाडी चालवुन एकटी जाणे, बाळ असतांना मात्र बाबा असायचे. एवढेच
काय, आंघोळ,शि-शु,डाय्पर बदलणे, दुधाची बाटली देणे, बाळाला दुध दिल्यावर ढेकर काढणे
हे सगळे बाबासुद्धा करतो याचे कौतुकही वाटले.
बाबा घरुन काम करायचा याचा हा एक फायदा होता. एकिकडे याचा अभिमान वाटायचा तर
दुसरीकडे काळजी/चिंता वाटायची,हळुहळु याचीदेखील सवय झाली. थंडी,पाऊस,नवीन्च गुटगुटित
बाळ, त्याचे झोपणे,उठणे, दुधाच्या वेळा, मुलिची धावपळ, अशा अनेक प्रसंगातुन बाळाने
आम्हा सगळ्यांची परिक्षा घेऊन झाली.
आमचे अनुभव त्यांना सांगण्यात अर्थ नसतो
आणि त्यांना तिथे ते लागुही होत नाहित. ते आपोआप प्रसंगातुन शिकतात, मार्ग काढतात,एकमेकांना मदत करतात,
खंबीर बनतात आणि त्यांनाही तेच हवे असते. तिथले
मुक्त वातावरण आणि शास्त्रीय कारणमीमां सा त्यांना जास्त ऊपयोगी ठरते. तिथे आधीपासुनच
दोघांची डॉक्टरने तयारी करुन घेतल्याने ते बरे पडते. माझी भुमिका मात्र त्यामुळे थोडी
पहिल्यांदा संभ्रमित होती नंतर हळूहळू त्याची सवय झाली. औषधे, दुध पिण्याचे प्रमाण,वेळा
आणि बाळाला फिरविणे यावर दोघांचेही लक्ष असायचे. घरिच असल्यामुळे मधुन मधुन बाळावर
लक्ष ठेवणे, खुपच रडायला लागल्यावर हवेत पालथे तरंगवणे असे अनेक प्रकार होत असत. आम्ही
“नवीनच आई-बाबा झालोत तु समजुन घे”असे बाळाशी बोलणे ऐकुन मजा वाटायची. (मनात मी म्हणायची
“ मीपण पहिली आजी झाले ना!} कधी कधी शांतच व्हायचा नाही तेव्हा क्वचित असे व्हायचे.
तसा बाळ शांत आणि हसरा होता. एकदा दुध पिऊन झाले की आम्ही “घोडे विकुन झोपायचो,आम्हाला
उठवुन दुध द्यावे लागायचे ,नाहि तर आमची झोप (उपाशी)) तशीच चालु राहायची.
2 महिने
झाल्यानंतर मला दुस-या लेकीकडे 10 दिवस विश्रांतीसाठी बदल म्हणुन पाठविले. आधी कशाला
पाठवतेस? म्हणुन मुलीला रागवुनही झाले,नंतर बदल म्हणुन मलाही थोडे बरे वाटले. तेव्हा
दोघांनी सगळेच सांभाळले त्यामुळे त्यांचाही थोडा आत्मविश्वास वाढला. तिस-या महिन्यात
थोडे सगळे व्यवस्थित वेळापत्रक जमले आणि कामेही वाटुन घेतली गेली त्यामुळे थोडा आराम
मिळाला सगळ्यांनाच. बाळही थोडा आवाज काढणे,ओळख दाखविणे, दुध मागणे( वेळच्या वेळी )
करु लागला. स्वत:चा स्वत: खेळु लागला. त्यासाठी लागणारी पुस्तके,खेळणी, पाळणे (आधुनिक),
झोपायची गादी, पलंग, चटई, गोधडी, कपडे,असे अनेक साधनांचा मुबलक साठा होता. छोट्या मुलीकडे
गेले होते तेव्हाच इकडे मुलीने एक पुस्तक अभिवाचनात माझे नाव घातले होते ( मी नको म्हटले
तरी) विरंग़ुळा म्हणुन. माझा पहिलाच प्रयत्न, त्यासाठी लागणारी तयारी, पुस्तक सगळे
काही झाले. विशेष म्हणजे सगळ्यांना, मुलिंला आवडले याचे समाधान वाटले आणि माझाही आत्मविश्वास
वाढला.
पाऊस आणि थंडीमुळे पहिले 2 महिने कुठे जाता
आले नाही नंतर मात्र सक्तीचे चालणे , फिरणे, कधी एकटे, कधी बाळाबरोबर रोज सुरू झाले.
बाळाची दिवसेंदिवस होणारी प्रगती , त्याच्या बाळ-लीला बघण्यांत वेळ कसा जायचा ते कळायचेच
नाही. मुलिचे बाळपण कधीकधी आठवायचे तेव्हा एवढा वेळ मला नोकरीमुळे देताच आला नव्हता.
रोजचे वेगळे फोटोसेशन त्याखाली चित्रावळी( कॅप्शन्स) देणे, बाळ निरखणे, दोघे अगदी उत्साहाने
करत असत. आठवडाअखेर बाजार,भाजी-पाला, दुध, खाणे-पिण्याचे प्रकार आणायचे आणि ते व्यवस्थित
पुरविणे. एक मात्र जाणवले की, आमच्यापेक्षा पुढची पिढी जास्त विचार-पुर्वक निर्णय घेऊन
ते अंमलात आणते. आपली साथ देणे एवढेच काम असते. माफक काळजी, कौतुक, प्रेमळ आणि बाळासोबत आश्वासक वागणे हे सगळे बघुन मन कौतुकाने,
अभिमानाने भरुन यायचे. त्यातच मित्र-मंडळी, नातेवाईक, वाढदिवस साजरे करणे हेही चालूच
असायचे कारण पहिले 2 महिने कोणीच बाळाला बघितलेले नव्हते.
चौथ्या महिन्यात बाळ खुपच उद्योगी,आकर्षित करायला,ओळखायला लागले. ठराविक व्यक्ती-ठराविक वेळी असे तेच ठरवू लागले. संध्याकाळी आई-बाबा, सकाळी आजी अशी त्यानेच वाटणी करुन टाकली आणि आम्हालाही बरे झाले. बाळाला बघुन मी माझे दुखणे-खुपणेदेखिल विसरुन जायचे. शेवटी शेवटी जास्तच लळा लावायला लागला. कधी टि.व्ही. वर सिनेमा,क्रिकेट मॅच, इतर अनेक कार्यक्रम( वेळ असेल तेव्हा) बघत ते 120 दिवस कसे आणि कधी संपले ते कळलेच नाही. जास्त थांबणेही शक्य नव्हते. युद्धाचे ढगही मध्ये-मध्ये फिरत होते त्यामुळे माझे 3 वेळा तिकिट रद्द केले गेले होते. शेवटी 24 मे चे मात्र काढावेच लागले. बाळाशी खेळतांना गाणे, कधी मुलगी तर कधी मी गायची त्यातच एका चारोळीचा जन्म झाला ती खाली देत आहे. बाळाला सोडुन यायचे जीवावर आले होते पण मनावर दगड ठेऊन निघाले आणि विमानात बसल्यावर मात्र डोळे वहायला लागले. बाळासाठी चारोळी:-
गोरे गोरे पान,फुलासारखे छान,
बाळ आमचे कसे दिसते छान,
बाळाचे नांव आहे “ईशान”
घराची,सगळ्यांची आहे “शान.”
Enjoyed reading the article Madhavi.One can relive the moments of becoming grandparents by reading this! Keep it up!
ReplyDeleteThank you Madhuri tai! 👏🙏
DeleteNice comments!