माझे अमेरिकेत पहिले अभिवाचन
यावर्षीच्या अमेरिकन वारित एक मोठी आणि धाडसी पाऊल नकळत उचलले याचे मा्झेच मला नंतर आश्चर्य वाटले. फेब्रुवरी-मार्च महिन्यातली गोष्ट,मी दुस-या मुलिकडे असताना मोठ्या मुलीने हे एक आवाहन माझ्यासमोर ठेवले. शिवाजी महाराजांची “स्वराज्य संकल्पना” हा विषय आणि पुस्तकांची यादी पाठवलेली होती. आवडीचे “दैवत”मग काय दररोज रात्री पुस्तकाचे वाचन आणि नंतर नोटस काढणे. वेळ मिळेल तसे वाचन मुलीने करुन घेतले एवढी स्वत: बाळंतीण असुनसुद्धा. एकदा तर मला “जमणार नाही” म्हणुन बोलले त्यासाठी रागवुनसुद्धा घेतले. पुस्तक होते“मंत्रयुद्ध”प्रकाश यादवाडकर लिखित,खरेच अगदी 3 स्तरावर वाचण्यासारखे आहे.
शिवाजी
महाराजांची “धुरंदर”ही प्रतिमा तयार होतीच पण त्यांचे अवतीभोवतीचे,निसर्गाचे अवलोकन,गुप्तहेरांची
समयसुचकता, प्रसंगी विरोधकाच्या वकिलाला कान-उघाडणी करुन त्याचे इमान जागे करणे (स्वत:
वेशांतर करुन),मोहिम अयशस्वी झाल्यास पुढिल कार्यवाही अशा अनेक गोष्टींमुळे मन अगदी
अभिमानाने भरुन येते. दुसरी बाजु सामाजिक-त्यावेळची सामाजिक परिस्थीती,सामान्यांचा
विरोध आणि संत रामदासांचे राजाला मिळणारे प्रोत्साहन आणि कौतुक व समाज मन तयार करण्यास
होणारी मदत असे अनेक कंगोरे या कादंबरीत आढळतात.1992 साली लिहिलेली ही कादंबरी कदाचीत
त्यावेळी युद्धाचे संदर्भ वेगळे असतील, आज 30 वर्षांनी अजुन बदललेत पण मुलतत्वे तीच
समान आहेत. महाराजांच्या काळात संदर्भ,शत्रु आणि तंत्रे वेगळी होती. आज तर “तंत्रयुद्धाची”
सुरुवात झालेली आपण अनुभव घेतच आहोत.
“मंत्रयुद्ध” म्हणजे महाराजांनी दिलेली “चतुसुत्री”
आपल्याला माहीत असेलच. स्वदेश, स्वाभिमान, स्वावलंबन आणि स्वधर्म जी आजही अवलंबणे आवश्यक
आहेत.समाजपुरुषांची बदलती जाणीव,उपाय आणि आशावादी दृष्टिकोन अशा अनेक अंगांनी लेखकाने
घेतलेला आढावा,प्रसंग,अनुषंगिक कथा आणि सकारात्मक दृष्टिकोन. एक उल्लेखनीय,ऐतिहासिक,सामाजिक
आणि आशावादी शेवट करणारी कादंबरी असे म्हणावे लागेल.कालातीत समस्या वेगवेगळ्या असतील
तरी त्यासाठी लागणारे संस्कार,जाणीव, बदलाची सजगता,धोरणाचे पृथ:करण करुन यशस्वी मार्ग
काढणा-या खंबीर नेतृत्वाची(शिवाजीमहाराजांसारखी)आजची गरज आणि लेखकाचा दृष्टिकोन हे
सगळे मला 15 मिनिटांत सांगायचे होते.
अभिवाचन म्हणजे दुसरे-तिसरे काही नसुन थोडे
कादंबरी वाचन, आवडलेले संवाद,दिलेल्या समयमर्यादेत,आज तो संदर्भ कसा आवश्यक आहे तो
पटविणे. पहिलाच प्रयत्न,तोही“अमेरिकेत”लोकांना,मुख्य म्हणजे लेकीला आवडला आणि मी तिचा
विश्वास खरा ठरविला याचे जास्त समाधान वाटले.यानिमित्त माझी स्टेजवर बोलायची भिती चेपली
हेही तेवढेच महत्वाचे. मुलीने केलेले थोडेसे रेकॉर्डिंग सोबत जोडत आहे, बघा कसे वाटते
ते!
https://www.facebook.com/reel/1662858624717864
Comments
Post a Comment