आमची बिनपावसाळी माथेरान सहल
अमेरिकेहुन आल्यानंतर लगेच विहिणबाईंचा फोन आला होता “आमच्याकडे पुण्याला विश्रांतीसाठी या” म्हणुन. आश्वासन दिल्यानुसार दोघांच्याही सोयीनुसार मध्यवर्ती ठिकाण ठरले “माथेरान.”दि. 19.6.ते 21.6.26 असे दिवस आम्ही दोघी विहिणबाई आणि व्याहीभाऊ निसर्गाच्या सान्निध्यात माहेरपण उपभोगत होतो.(पुरुषांना माहेरपण हवे असते.)
पावसामुळे
टॉय ट्रेन ( नेरळ-माथेरान) बंद होती,खरे तर यावर्षी पाऊस उशीरा होता तर निदान
25-30 जुनपर्यंत चालु ठेवायला हरकत नव्हती. आम्ही दोघे लोकलने नेरळला 11.00 वाजता आणि
ते दोघे पुण्याहून तेव्हाच पोहोचले. तिथुन
वर माथेरानला जाईपर्यंत 12.00 वाजले. गाडी पार्कींगला लाऊन आम्ही इ-रिक्शाच्या रांगेत
उभा राहिलो तोपर्यंत दोघेजण चालत-चालत होटेलच्या दिशेने पोहोचलेदेखील. नंतर एकत्र 1.00 वाजता हॉटेलवर जाऊन
फ्रेश हौऊन 1.30 वाजता जेवायला डायनिंग हॉलवर पोहोचलो. गुजराती थाळी बघुनच पोट भरुन
गेले. फास्ट-फुडची सुरुवात मला वाटते गुजरातमध्येच झाली असेल. ढोकला, जिलेबी -फाफडा,पाणी-पुरी,
भेलपुरी, शेव-पुरी,पकोडा असे अनेक प्रकार जिभेचे चोचले पुरविते आणि सगळ्यांना आवडतातही. आपल्याकडेपण कोथींबीर वडी, अळू-वडी,भजी-पापड, कुर्डया,
कोशिंबीर, डाळ-वडा,कोबीचे भानोले,.. प्रकार असतातच पण क्वचित सणा-सुदीला, कोणी पाहुणे
येणार असतील तरच. हल्ली डायटच्या नावाखाली हे सगळे प्रकार वर्ज्यच करावे लागतात. केव्हा
तरी असे बाहेर पडल्यावर त्याचा आस्वाद घ्यायचा एवढेच.
असे
भरपेट जेवल्यावर थोडी शतपावली आणि झोक्यावर आराम करुन आम्ही 2.30 वाजता वामकुक्षी करायला
गेलो. सकाळीही लवकर उठल्यामुळे जरा निवांतपणा हवाच होता. मी मात्र दुपारी झोपत नसल्यामुळे
साइड लॅंपच्या उजेडात निवांत कादंबरी वाचत पहुडले होते. वाचता वाचता……( बकेट-लिस्ट..).
5.00 वाजता फिरत-फिरत शार्लेट लेकला गेलो पण तिथे पाणीच नसल्यामुळे उगीच आजुबाजुला
झाडे-झुडपे बघत रमत गमत 7.00 वाजता संध्याकाळी रुमवर परतलो. थोडा पुन्हा आराम करून
8.00 वाजता जेवायला बाहेर पडलो. 8.30 वाजता लाईव्ह गजलचा कार्यक्रम होता. त्यामुळे
गाणी ऐकत-ऐकत जेवणाची मजा काही औरच होती. सकाळी जेवणात फ्रुट कस्टर्ड होते तर संध्याकाळी
रबडी-मालपुआ होता. ताक,दही फास्ट-फुड आणि सॅलडपण होते. चायनीज मेनुवर ताव मारुन जेवल्यामुळे
पोट तसे जड झाले होते. पुन्हा 10.00 वाजता गप्पा,शतपावली आणि मंद झोका घेऊन झोपायला
10.30 ला रुमवर परतलो.
दुस-या
दिवशी तरी निदान पाऊन पडेल या अपेक्षेने सकाळी 8.00 वाजता फ्रेश हौऊन नास्त्यासाठी
बाहेर आलो. ब्रेड-बटर,पोहे,उपमा,फळे आणि ढोकळा अशा अनेक प्रकारचा नास्ता करुन थोडे
सुस्तावलो. उन्हात,झाडाच्या सावलीत पुन्हा गप्प्पा,नातवाबरोबर( टॅबवर) दर्शन, हालहवाल
विचारुन पुरुष लोक पोहायला गेले आम्ही बायका पुन्हा गप्पा मारित बसलो. यथेच्छ पोहुन/डुंबुन
झाल्यावर 12.00 च्या सुमारास रुमवर गेलो. आराम करुन पुन्हा जेवायला बाहेर 1.30 ला बाहेर
पडलो. जेऊन झाल्यावर पुन्हा शतपावली,मंद झोका आंणि गप्पा मारुन झाल्यावर वामकुक्षी
घेऊन 6.00 वाजता बाजारात फेरफटका मारुन 7.00 वाजता लहान मुलांसाठी जादुचे प्रयोग होते
त्याचा आनंद घेतला. 7.30 वाजता हाऊजी खेळुन पैसे जिंकल्याचा आनंद चौघांनी घेऊन जेवायला
गेलो. जेवणात दुधी हलवा, आंणि इतर बरेच स्वादिष्ट प्रकार होते. आजही जेवतांना लाईव्ह
गाण्याचा कार्यक्रम होता. स्वत: उत्साही लोकांनी भाग घेऊन गाणा-याला चिअर-अप केले.
10.00 वाजता नेहमीप्रमाणे शतपावली, मंद झोका आणि गप्पा मारत 10.30 ला झोपायला गेलो.
तिस-या
दिवशीही पावसाचा पत्ताच नव्हता. सगळे काही आवरुन 8.00 वाजता नास्ता करायला गेलो. इडली-सांबार,मसाला
डोसा, चटणी, ब्रेड-बटर,फळे असा हेवी नास्ता करुन रुमवर परतलो. 9.00 वाजता सर्व सोपस्कार
करुन बाहेर पडलो. 10.00 च्या ट्रेनचे तिकेटस
बुक करुन परतीच्या प्रवासाला लागलो. गाडी पार्कींगमधुन काढुन नेरळला 11.00 वाजता पोहोचलो.
अशीच पुन्हा एखादी ट्रिप काढुया या आश्वासनावर आम्ही सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला
आणि 11.30 च्या गाडिने घरी 1.30 ला घरी पोहोचलो. मध्ये 2 घेणार स्टॉप घेणार असल्यामुळे
त्यांना पुण्याला पोहोचायला संध्याकाळ झाली. जरी पाऊस नव्हता तरी मने आनंद व समाधानाने
भिजलेली होती.
छोटी व
मोठी ट्रेन, ट्रेकिंग, घोडेस्वारी,जंगलात चालत-चालत फिरण्यासाठी (जुन ते ऑक्टोंबर)
प्रसिद्ध असलेले हे एकमेव प्रदुषण-विरहित थंड हवेचे तसेच पावसाळी ट्रिपसाठी मुंबई-पुण्याला
अत्यंत जवळ असलेले हे ठिकाण नक्किच पुन्हा भेट द्यायला आवडेल. आमच्या विसाव्याची काळजी
घेणारे व्याही व विहिणबाईंचा अभिमान वाटला. प्रवासाचा लसावी असा:-
1.या माहेरपणात
अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. साधारण वयोगट( 55 च्या वर)सारखाच आणि कोमन फॅक्टर
मुले/मुली असल्यामुळे विषय एकमेकांना जोडणारेच होते. पाण्याअभावी एका चांगल्या थंड
हवामानाचे/ पावसाळी ठिकाणसुद्धा कसे कोरडे वाटते हे जाणवले, याला जबाबदार आपणच आहोत.तिथे
कुठेही नवीन वृक्षारोपण दिसले नाही.
2. 10-15 वर्षांपुर्वीचे माथेरान आणि आत्ताचे
माथेरान यांत बराच फरक पडला होता पण रिझोर्ट छान असल्यामुळे जाणवला नाही. याआधी आम्ही
सरकारी बंगल्यात राहत होतो. तिथे स्वयंपाकी,थंड हवा,मुले, पाऊस व इतर नातेवाईक यांचा
सहवास असायचा.आता बाहेर मात्र पाण्याअभावी
सगळे ओसाड वाटत होते.
3.गर्दी
खरे तर दिवसेंदिवस वाढत आहे पण त्याप्रमाणात सोयी-सुविधा वाढत नाहीत.
4.रोजच्या
जीवनात तसे आम्ही आता चौघेही निवृत्त आहोत तरी बदल सगळ्यांना हवाच असतो. निवांतपणा,
मनातल्या भावना व्यक्त करायला अशा ठिकाणि गेले पाहिजे.
5.शांती,समाधान
आणि एकमेकांचा सहवास हा नात्यांना जोडायला आवश्यक आहे.
6.मनमोकळेपणा आणि बोलणे आवडत असल्यामुळे एकमेकांना
मजा आली.
7.शासनाने
देखिल थोडे लक्ष घालुन स्थानिक नागरिकांना सोयी-सुविधा द्याव्यात.
8.फोटोसेशन,गप्पा
आणि मनोरंजन असा एकुणच सहवास आनंददायी ठरला.
9.याआधीच्या
माथेरान, अंधारबन,( लेख लिहिलाय) आणि भीमाशंकर येथील पावसाळी सहली ( मुलींबरोबर ) रोमांचकारक
आणि साहसी होत्या. यावेळी मात्र तसे नव्हते. (वाढते वय आणि प्रगल्भतेचा परिणाम असावा.)
Comments
Post a Comment