श्वास भाग-2 ( ब्रम्हविद्या आणि प्रकाशयोग)

पहिल्या भागात आपण श्वासाचे महत्व आणि तो कसा प्रत्येकाला आवश्यक असतो हे बघितले. या भागात आपण तो कसा कमवावा,शुद्ध असावा आणि प्रकाशयोग म्हणजे काय? हे आपण आपले जीवन कसे उजळुन टाकावे याबाबतचा परिचय करुन घेऊया. आपण घरात रोज झाडु मारतो घर स्वच्छ राहण्यासाठी पण दिवाळी किंवा इतर वेळी कसा काना-कोपरा शोधुन शोधुन साफ ठेवतो. तसेच काहीसे श्वासाबाबत आपण करावयास हवे. प्रकाश योगादवारे आपण आपल्यातच असलेली शकती शोधणे.  श्वासाकडे लक्ष देऊन/निरिक्षण करुन त्याप्रमाणे सजगतेने श्वास घेणे, त्याचे प्रकार,अष्टांग मार्ग ,चकरे पृजवलीत करणे, अंमलात आणणे आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक, आध्यात्मिक दृष्टिकोन वाढीस लावणे हे ब्रम्हविद्येचे मुख्य कार्य आहे. प्रकाशयोग हा आपणच आपला उद्धार कसा करुन घेणे हे शिकणे/शिकविणे/समजुन घेणे होय.

     10 वर्षांपुर्वी मी हे शिकण्याचा प्रयत्न केला होता,आता पुन्हा एकदा उजळणी करण्यासाठी या वर्गाची सुरुवात केलीय. ब्रम्हविद्या ही एक आध्यात्मिक,शारीरिक,मानसिक प्रगतीसाठी लागणारे एक शास्त्र किंवा तंत्र असे म्हणता येईल. 1200 वर्षांपासुन गुरु-शिष्य परंपरेने हे ज्ञान शिकविले जात होते. नेपाळमध्ये जाऊन गुरु डिंगले यांनी हि विद्या शिकुन नंतर त्याचा प्रसार भारतात 1970 पासुन त्याची उपासना ब्रम्हविद्या साधक संघामार्फत शिकविणे हे “ना नफा” अशा तत्वावर सुरु झाले. आज त्यांचे जगभर अनुयायी असुन आताच्या धावपळीच्या,स्पर्धेच्या जगात ह्या तत्वाची/अभ्यासाची गरज आहे असे मला वाटते.   

            शरिर, मन व आत्मा याचे एकत्र ज्ञान माणसाने प्राप्त केल्यास तो कोणत्याही शारिरिक मानसिक अडचणींवर मात करुन यश प्राप्त करु शकतो. श्वसनप्रकार, अष्टांगमार्ग आणि साधनेद्वारे संतुलित जीवन जगणे शक्य होईल. फुकट मिळालेल्या श्वास आपण कसा घ्यावा आणि घेऊ नये हे तर शिकवतातच. त्याचबरोबर अष्टांग राजमार्गांची ओळख आणि साधना नियमित करणे हे मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. 1)बालवर्ग 2) प्राथमिक 3) प्रगत आणि प्रदिपक असे 4 स्तरावर ही विद्या शिकविली जाते. दुरस्थ आणि 5 दिवसिय रहिवासी शिबीर असेही आपापल्या सोयीनुसार या वर्गात आपण प्रवेश घेऊ शकता. सर्वव्यापकत्व, सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान  अशा परमेश्वराची ओळख ही वेळात वेळ काढुन करुन घेणे ही एक काळाची गरज आहे. यामध्ये 4-16-8 श्वास घेणे, धरुन ठेवणे आणि सोडणे हे जे नियम/तत्व/प्रमाण सांगितले जाते ते मानवी अर्थ-व्यवहारासाठीसुद्धा आवश्यक आहे असे मला वाटते.श्वासाऐवजी आपण आपली संपत्ती,पैसा आणि वेळेच्या बाबतीतही हे तत्व/प्रमाण (कमविणे, साठवणे, सोडुन देणे/दान करणे) अंमलात आणल्यास ब-याचशा भौतिक समस्या कमी होऊ शकतील. शांती, समाधान आणि समृद्ध जीवन हेच प्रत्येकाचे ध्येय असते आणि ते गाठण्यासाठीचा हा एक प्रयत्न नक्की सर्वांनी करावा ही कळकळीची विनंती व त्यासाठीचा हा लेखनप्रपंच!

सोबत -भाग-१

लिंक माहीतीसाठी जोडलीत.

https://share.google/HsOBfTuk3xtW3y5Dhanyawad

https://share.google/9TjxpYf4aehbprmSd

https://poonwa.blogspot.com/2021/06/blog-post_26.html

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव