ह्दयस्थ गुरु-भाग-2,(गुरुपोर्णिमेच्या निमित्त्याने) :-

       भाग-1 मध्ये आपण गुरुचे महत्व,प्रकार आणि स्वरुप बघितले. आता आपण श्री.दत्तगुरुंचे मंदिर, उगमस्थान आणि भक्तीचे प्रकार पाहुया. प्रत्येकाच्या क्षितीजावर नेहमीच”गुरु” उदयाला येत असतो. वेगवेगळ्या स्वरुपात जन्मापासुन मृत्यूपर्यंत कोणत्या ना कोणत्या गुरुचा आधार/मार्गदर्श्न घेतल्याशिवाय व्यक्तिची प्रगती/उत्क्रांती होणे शक्य नाही अगदी शस्त्र,शास्त्र आणि कलेच्याबाबतीत देखील. त्यासाठी लागणारी श्र्द्धा व भक्ती मात्र प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. पशुंच्याही अंत:करणात अन्नदात्या स्वामींविषयी पराकाष्टेची भक्ती असते. संत,गुरु हे सगळे सर्व सामान्य लोकांच्या मनात भक्ती,  श्रद्धा जागविण्यासाठी सदैव कार्यरत असतात. त्यांच्या मनातली अंधश्रद्धा दुर करुन ख-या प्रेमाची /परमेश्वराची ओळख करुन देणे. त्यांना चांगल्या मार्गावर आणणे,अज्ञान दुर करणे अशा अनेक मार्गाने समाजोन्न्तीसाठी प्रयत्न करणे.भगवान श्री. दत्तात्रेयांची जन्म-कथा सगळ्यांना माहित आहेच. या अवतारात भगवानांची तीन मुखे आहेत जी रज, तम व सत्व गुणांची तर ब्रम्हा,विष्णु व महेशांची शक्ती एकवटलेली दिसुन येईल. महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रप्रदेश  आणि गुजरात येथील प्रसिद्ध मंदिरे भक्तांना आकर्षित करत असतात. आदीगुरु म्हणुन पुजणारे दत्तात्रेय भगवानांची प्रतिके सहा सहा हात:-निष्ठा, कर्म, योग निती,ज्ञान व तत्व, 4- कुत्रे-वेदांचे प्रतिक, गाय व औदुंबर- इच्छापुर्तीचे आश्वासन देतात. तसेच प्राणी व वनस्पती/झाड,निसर्गाप्रती कृतज्ञता बाळगण्यांस शिकवितात.

            स्वत: दत्तात्रेयांनी 24 गुरुंचा व त्यांच्याकडुन मिळणा-या गुणांचा परिचय करुन दिलेला आहे.थोडक्यात माहिती सांग़णेच शक्य होईल.1) पृथ्वी-सहनशीलता 2) वायु-विरक्ती 3) आकाश-अचलता 4)पाणी-स्नेहभाव 5)अग्नी-पवित्रता. 6)चंद्र-विकार-बाधा न होणे.7)सुर्य-नि:पक्षपातीपणा 8)कपोत(कबुतर)-अलिप्तता 9) अजगर-निर्भयता 10) समुद्र-परोपकारी 11) पतंग-मोह, त्याग. 12)मधमाशी-धनसंचय, त्याग.13)गजेंद्र-काम-विकारावर मात.14) भ्रमर- विषयांत न अडकणे.15) मृग-मोह-त्याग 16) मत्स्य-चवीत न गुंतणे 17) पिंगला(वेश्या)-आशेचा त्याग 18) टिटवी-उपाधिचा त्याग करणे 19) बालक-आनंदी 20) कंकण- एकांतवास साधणे 21) शर कर्ता (कारागीर)-एकाग्रता 22) सर्प-सावधान 23) कोळी-ईश्वरेच्छा 24) भ्रमरकिट-ईश्वस्वरुपता. गुरुंचे 3 स्तर असतात.गुरु,सद्गुरु आणि परत्पर गुरु. तसेच गुरु केल्याशिवाय इष्ट कार्याची सफलता प्राप्त होत नाही असे समजले जाते. त्यासाठी 12 प्रकारचया गुरुंची माहीती देण्यांत येते.1) धातुर्वादी 2) चंदन 3)विचार 4) अनुग्रह 5) परिस 6) कच्छ्प 7) चंद्र 8) दर्पण 9) छायानिधी 10) नादनिधी 11) क्रौंच पक्षी 12) सुर्यकांत.

          सर्व धर्मांत गुरुंचे महत्व आहे. गुरु-परंपरा ही जुनी पद्धतीमुळे शिक्षण,संस्कार आणि वर्तवणुकिचा प्रत्यक्ष गुरुसोबत राहुन,मुंज झाल्यावर साधारणपणे हे शिक्षण होत असे. याचे माहात्म्य हळुहळू कमी होत असले तरी अजुनही काही ठिकाणी चालु आहे. शिवाय कुलगुरु,एखाद्या कुळाचे, समाजाचे (4-आदी शंकराचार्य) अजुनही मानले जातात. मी पाहिलेली दत्तांची मंदिरे कारंजा, गाणगापूर (कर्नाटक), अक्कलकोट, दिंडोरी(नाशिक), दत्तशिखर-माहुर, गिरना (गुजरात)अशी असुन कुरवपुर, पीठापुर, औदुंबर, नरसोबावाडी अजुन बघायचे आहे, बघु कसा योग येतो ते!

        श्री.स्वामी समर्थांनी संस्कृती व सदाचाराचे मुळ विचार मांड्ले तर श्री. साईबाबांनी(श्रद्धा व सबुरीचा) संदेश दिला. संपुर्ण भारतात, जगात धर्म-जागृती करुन हिंदुधर्मप्रसार केला. श्री.दत्तात्रेय महाराजांच्या पादुकांना मुर्तीपेक्षा जास्त महत्व दिले जाते. तसेच पुर्वी “गुरुचरित्र” वाचण्याची स्त्रियांना परवानगी नव्हती. आता कालानुरुप आणि कलियुगाची आवश्यकता व काही नियम शिथील करुन तशी परवानगी देण्यांत आलेली आहे. रोज “बीजमंत्र” जपल्यास अडी-अडचणी,क्लेष दुर होतात असे समजले जाते. गुरु चरीत्र पारायण करणे हेही बरेच फायदेकारक असते. मंत्र खालीलप्रमाणे:-

                     !! ओम द्रां दत्तात्रयाय नम:!!

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव