मधुसखी आणि मधुमित्र-भाग-2

                         (The one who holds a place in every heart)

           भाग-1 ( मित्रांगण-2021)मध्ये आपण मित्रांची ओळख आणि महत्व वाचले असेलच. मैत्रीबद्दल कितीही लिहिले तरी कमीच असते असा हा जिव्हाळ्याचा विषय पुन्हा एकदा तुमच्या भेटिला. त्याचे झाले असे,मधमाशीपालनासाठी देण्यांत येणारा “मधु-मित्र,मधुसखी” देण्यांत येणारा मानाचा पुरस्कार. वृत्तपत्रात ही बातमी वाचुन आनंद,कौतुक तसेच नावाचेही कुतूहल वाटले. संपुर्ण बातमी वाचल्यावर कळले कि,मानवी जीवनासाठी आवश्यक असलेली हि एवढी मधमाशीचे अनन्यसाधारण महत्व. मधमाशी पालन (beekeeping) ह शेतीला जोडधंदा म्हणुन केला जाणारा आणि कमी खर्चाचा व्यवसाय आहे. यात मध व मेण असे मौल्यवान पदार्थ तर मिळतातच सोबत मधमाशी करित असल्यामुळे परागीकरण पिकांच्या उत्पादनात वाढ होते. तसेच मधुमाशी पालन यासाठी शासन व्यवसाय मार्गदर्शनही देते. याशिवाय मोठ्या बागांमध्ये ( महाबळेश्वर,बोरिवली येथे मी स्वत: बघितल्यात.) वनखाते याचे प्रदर्शन भरवुन पेट्या व उपकरणे व त्याचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करतात. मधमाशी एक किटक असुन फुलांमधील रस गोळा करुन पोळ्यात मध तयार करते. कृत्रिमरित्यासुद्धा हे करता येते. पेट्यात मधमाशींना बंद करुन. समुहजीवन,अन्न गोळा करणे आणि पोळ्याची रचना हि एक मानवासाठी निसर्गाकडुन मिळालेले वरदान आहे. हे पारितोषिकपण उत्तेजनार्थ आणि प्रशंसीय कारणानेच दिले जाते.

            तशीच महत्वाची भुमिका मानवी नातेसंबंधात मैत्रि बजावित असते मग ती मैत्रिण असो वा मित्र. एकदा मैत्रिण सांग़त होती,तिच्या मुलीला( वय वर्षे-7-8) कोणीतरी विचारले म्हणे कि, तुला कोणी बोय फ्रेंड (bf) नाही का म्हणुन! 20-22 वर्षापुर्वीची ही गोष्ट. खरे तर त्या वयात काय कळते.ऩिरागस आणि बालमैत्री ब-याव वेळा मोठेपणीसुद्धा महत्वाची ठरते.आपल्याकडे स्त्री-पुरुष मैत्री म्हणजे अब्रम्हण्यम! त्यातला मोकळेपणा आणि मर्यादा बाळगल्यास एक सुंदर नाते निर्माण होऊ शकते. परस्पर-पुरक आणि प्रगल्भता यासाठी लागते. प्रौढ आणि म्हातारपणात हे नाते खुपच आवश्यक असते. कोणत्याही सुख-दु:खात योग्य मार्ग,हितगुज आणि तत्वांसाठी मैत्री हे एक आवाहन असते. हे मैत्रीचे नाते कधी कधी नवरा-बायको, दिर-भावजय किंवा भाऊ-बहिणींमध्येही आढळते. ही मैत्री जात-पात,गरिब-श्रीमंती,देश- परदेश असे काही बघत नाही.मैत्रीपू्ण संबंध कोणत्याही समस्येवर मात करू शकते. पालक, बालक आणि शिक्षक हे या मैत्रीचे ऊगम स्थान आहेत. ढीगभर आभासी मित्र/मैत्रिणि यातली खोली समजुन घेऊ शकत नाही. मोजकेच पण जीव देणारे आणि दिर्घकाळ टिकणारीच खरी मैत्री म्हणता येईल. आजच्या स्पर्धेच्या,ताण-तणावाच्या जगात तर हे नातेच सगळ्या समस्येवर मात करु शकते. परदेशांत असताना मी हे खुप छान अनुभवलेय. कसे एकमेकांना मदत करतात,कामे करातात आणि साथ देतात. त्यासाठीचे हे नांव खुप सुंदर आणि अर्थपुर्ण वाटते. काही मित्रतर आयुष्य सुगंधित करुन सोडतात आणि परत कधी भेटतही नाहित. मी मात्र भाग्यवान आहे खरी मैत्री अनेकदा अनुभवली आहे म्हणून मी ठामपणे सांगू शकत. असे हे मित्र-मैत्रिण तुम्हालाही आहेत ना,असलेच पाहिजेत,शोधा म्हणजे सापडतील. 

                                  !! मैत्रीदिनाच्या शुभेच्छा!!

 सोबत-भाग-1 ची लिंक व फोटो. 

   


.

 


Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव