विद्यार्थी, आंदोलन आणि बरंच काही….

           एकेकाळी मुलभूत हक्कांमध्ये”शिक्षण हक्का” चा समावेश होणे हे एक महत्वाचे पाऊल ठरले होते. शैक्षणिक,सामाजिक क्रांतीसाठी हे एक अत्यंत आवश्यक आहे हे वारंवार समाज सुधारकांनी आणि  शैक्षणिक क्रांतीकारकांनी पटवुन दिल्यावरच हे शक्य झाले होते. अज्ञान, गरिबी आणि परिस्थितीमुळे अनेकजण शिक्षणापासुन वंचित राहत होते त्यांना यामुळे दिलासा आणि प्रोत्साहन मिळाले. निदान काही प्रमाणात समस्या सुटण्यांसमदतच झाली मात्र दर्जा टिकविणे/सांभाळणे हे नाही जमले आपल्याला. 

           इंग्रजांनी 10+2+3 हा घालुन दिलेला पायंडा अजुनही आपण सांभाळत आहोत. त्यातुन निर्माण झालेले पांढरपेशा समाज पुढे जाऊन आपली स्वतंत्र शिक्षणव्यवस्था निर्माण करू शकली नाही. असलेली व्यवस्था सर्वसमावेशक कशी करता येईल याचाही विचार केला जात नाही याचे जास्त वाईट वाटते.आपले विद्यार्थी परदेशात जाऊन चमकतात पण इथे का नाही? याचाही कोणी विचार करत नाही. एकीकडे स्पर्धा,परिक्षा आणि वर्गासाठी चाललेले राजकारण,पैसा दिवसेंदिवस शैक्षणिक स्तर किती खालावत चाललाय हे आपण उघड्या डोळ्यांनी बघतच आहोत. 

          विद्यार्थी उद्याचा देश घडवितो असे म्हणतात, त्या अर्थानेही आपण सर्व जगापुढे आदर्ष आहोत. या जाणीवेतुन तरी शिक्षक, पालक आणि देशचालकांनी जेन झीचे महत्व ओळखुन पावले उचलावीत असे वाटते. याआधीच्या लेखातही मी लिहीले होते कि, शैक्षणिक धोरण आखण्यापुर्वी देशाला कोणते क्षेत्र आवश्यक जास्त आहे?त्यासाठीचे नियोजन {वार्षिक, त्रैवार्षिक,पंचवार्षिक] उपाय योजणे,त्यानुसार आगाऊ तरतुदी करणे आणि तसे पालक,शिक्षक यांना विश्वासात घेऊन तसे विद्यार्थी तयार करणे, त्यांचे मन वळविणे, सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे अशा अनेक प्रकारानेमनात आणले तर सगळे काही करु शकतो. तसेच पारंपारिक,प्रगत,आधुनिक आणि जागतिक स्तरावर कुठेही आपण पुढेच राहिले पाहिजे एवढे लक्षात घेतले पाहिजे.  

           हक्काची जाणीव असणे वाईट नाही पण त्याचा कोणी गैर वापर करु नये एवढीच किमान अपेक्षा. तसेच जिथे खरिच गरज आहे,बुद्धिमत्तेच्या जीवावर सगळ्यांना समान संधी, कोणतेही आरक्षण वा पैसा हे शिक्षणाच्या आड येता कामा नये एवढीच किमान अपेक्षा. यावर्षीच्या विध्यार्थी आंदोलनावरुन अनेक मते, वाद-विवाद आणि इतर अनेक बाजु समोर आल्या तरी त्यातुन बोध किती,कुणी आणि कसा घ्यावा हे ज्याचे त्याने ठरवावे. तसेच अति-आत्मविश्वासा ने कोणी चुकिचे पाऊल उचलू नये हेही लक्षात घ्यावे. चुकिचा समज पसरायला वेळ लागत नाही एवढे नक्की. “विरोध होत नाही”म्हणजे आपलेच बरोबर असेही कोणी समजू नये. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हे प्राथमिक कर्तव्य समजुन तशी सगळ्यांनीच व्यवधान ठेवावे. 

         पालकांच्या करियर, स्पर्धा आणि वेळेअभावी विद्यार्थ्यांना इतर अनेक प्रलोभने आकर्षित करत असतात. संस्कार कमी पडतात,शिस्त नाही,बोलण्याचे भान नाही अशा अनेक जेन झीला दोष दिले जातात. त्यासाठी जबाबदारही आपणच आहोत हे सोयीस्कर विसरले जाते.  मातृभाषा नको, वाचन नको आणि खेळायला,अंग मोडायला नको अशा परिस्थितीत मुलांची मानसिक वाढ होणार कशी?त्यासाठी पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांची, सामाजिक मदतीची गरज निर्माण झालेली आहे.

           दुसरीकडे विद्यार्थ्यांना लक्ष्य करुन अनेक अतिरेकी कारवाया करायला वापरल्या जातात. (बॉंबहल्ला करणे,व्यसनाधीनता,राजकीय कामात वापर) अशावेळी त्यांनी योग्य मार्गावर आणणे हेही एक सगळ्यांचे कर्तव्य ठरते. मुलांमध्ये तुलना टाळणे, त्यांना योग्य दिशा दाखविणे, पोषक वातावरण निर्माण करणे, खेळांचे मैदानासाठी आरक्षित असलेली जागा राखणे, नवनवीन जागा निर्माण करणे, इत्यादी अनेक प्रकारे आपण विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवुन त्यांच्याशी सख्य साधु शकतो. त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टीं करण्याला प्रोत्साहन देणे, अवाजवी हट्ट न पुरविता काही वेळा काही हट्टातुन त्यांना त्यांचेही ऐकले जाते हा संदेश जाणे महत्वाचे. अत्यंत हुशार असलेली ही पिढी योग्य मार्गदर्षनाने नक्किच उद्याचे भविष्य उज्वल करेल हा मला विश्वास आहे.

            त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही लक्षात घेतले पाहिजे की, पालकांनी आपल्यासाठी खुप कष्ट घेतलेले आहेत. स्वत:पेक्षा मुलांसाठी  ते काहीही करण्यासाठी तयार असतात. त्यांचे भविष्य पालकांच्या हातात असते तेव्हा त्यांना त्रास होणार असे आपण वागता कामा नये. तसेच आपल्या आई-वडिलांना लाज वाटावी असे कोणतेही कृत्य करु नये एवढी तरी खबरदारी नक्किच सगळ्यांनी घ्या




Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव