बोलायला तर हवंच…एक मानसशास्त्रिय दृष्टिकोन.
हा विषय स्पर्धेसाठी दिल्यावर पहिल्यांदा काय लिहावे ते कळेचना. मी स्वत: अबोल,शिष्ठ( असे लोक समजतात) आणि स्वयंकेद्रित/घुमी (INTROVERT) अशी आहे. त्यामुळे काय बोलायचे हा मलाही व-याचवेळा प्रश्न पडतो. समोरचा बोलका असेल तर मला बरे वाटते कारण मी स्वत:हुन कधी कोणाशी बोलत नाही. काही अपवाद आहेत त्यामध्येपण. जन्माला आल्यापासुन्न प्रत्येक प्राणी,वनस्पती,पशूपक्ष्यांना व्यक्त तर व्हायचेच असते फक्त प्रेत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. निसर्गाचा प्रेत्येक घटक व्यक्त होण्यासाठी आतुर असतो. माणुस मात्र शास्त्रशुद्ध भाषेत, व्यवस्थित समोरच्यला कळेल अशा रितीने व्यक्त हौऊ शकतो. एकप्रकारे देवाने अधिकची ही बोलण्याची कला दिलेली आहे असेच म्हणावे लागेल. बोलले की मनातल्या भावना स्पष्ट होतात. हेतु कळतो आणि त्याप्रमाणे समोरचाही प्रतिसाद देऊ शकतो.
काहिजणांचे
बोलणे ऐकत राहावे असे वाटते तर काहीजण कधी गप्प बसतील म्हणुन वाट पाहावी लागते. काहिजण
दुस-याना आवडेल,रुचेल असेच बोलतात तर काहीजण मौनं सर्वार्थ साधनम” म्हणुन कायम गप्पच
बसतात. खरे तर बोलण्यावरुन एखाद्याचे व्यक्तिमत्व ठरते असे म्हणतात. सौजन्यपुर्ण, मृदू,
प्रेमळ बोलणारी माणसे सगळ्यांनाच आवडतात. याउलट कसेही काहीही बोलणा-या माणसांकडे लोक
सहसा दुर्लक्षच करतात/टाळतात. अती- परिचयात मानहानी यानुसार काहीजण घरातल्या बायकांवर,काम
करणा-यांवर कायम वैतागुन/ओरडुनच बोलत असतात. त्यांना तसेच बोलावेसे वाटते त्याला काय
करणार? याउलट दोन शब्द प्रेमाने बोलल्यावर तेच काम किती आवडिने करतील याचा अनुभव अनेकदा
येतो पण ते त्यांना समजत नाही. मोठी माणसे कायम अधिकार वाणीनेच लहानांशी बोलतात,त्याशिवाय
आपण मोठे आहोत असे वाटत नसावे त्यांना. लहानांनी कायम खाली बघुनच बोलावे,विशेषत: घरातल्या
सुनांनी/मुलींनी अशी अपेक्षा असते. अर्थात हे सगळे अलिखित नियम असतात त्यामुळे असे
कुठे लिहिले असे आत्ता विचारले तर आम्हाला
सुद्धा सांगता येणार नाही. नम्रता बाळगल्यास अधिक संबंध चांगले राहण्यास मदत होते एवढे
मात्र नक्की.
काहिजण कामापुरते
गोड बोलतात,एकदा काम झाले की, तु कोण मी कोण? असा बाणा असतो त्यांचा. मानसशात्रिय दृष्टिकोनातुन
विचार केल्यास व्यक्त होणे/बोलणे हि एक मानसिक गरज असुन ती जर वेळीच ओळखली नाही तर फार मोठ्या समस्या निर्माण
होऊ शकतात एवढे नक्की. पालक,बालक आणि शिक्षक हे मोठी जबाबदारी पार पाडित असतात मुलांना
बोलते करणे. लहानपणापासुनच ही सवय लावणे गरजेचे असते. मोठेपणी त्याला स्वत:ला जगापुढे
उभे राहायचे असते त्यासाठी बोलणे ( योग्य ते,तिथे,तेव्हा) आवश्यकच असते. समोरचा माणुस
काही अंतर्ज्ञानी नसतो माझ्या मनात काय आहे ते त्याला कळायला. बरेचशा घरात ही एक मोठी
समस्या असते, “संवादच नसतो एकमेकांत ”मग ते
नवरा-बायको, मुले-पालक असोत वा म्हातारे आई-वडिल असोत. हल्ली वेळच नाही ही एक मोठी
गुंतागुंतीची बाब निर्माण (मोबाईलमुळे) झालेली आहे. मला वाटते जेवढे सामाजिक माध्यमे, मोबाईल,टि.व्ही. आणि संगणकावर वेळ जात
असेल त्याच्या 1/10 पटही प्रत्यक्ष माणसे एकेमकांशी बोलत नसावीत. आभासी दुनिया हा तर
एक शाप वाटतोय. एवढे त्याचे दुष्परिणाम दिसत असुनही माणसे सुधारत नाहीत. एकेकाळी “
मुर्ख डब्बा” म्हणुन हिणवला गेलेला टि.व्हि.सुद्धा या मोबाईलमुळे मागे पडत चाललाय कारण
सगळे एका बोटाच्या क्लिकवर मिळतंय मग वेळ कशाला एकमेकांसाठी घालवा.
सगळे कधीतरी
भेटलो तरी प्रत्यक्ष भेटल्यावर ठराविक बोलुन झाले कि सगळे आपापल्या मोबाईलमध्ये अक्षरश:
गुंगून जातात. हातातच आहे म्हटल्यावर त्याला वेगळे करताच येत नाही ना! त्याचेही दुष्परिणाम
हळूहळू परदेशातील लोकांना जाणवायला लागलेत. हल्ली त्यावरही बंदी घालायचा, नियंत्रण
आणायचा विचार चालू आहे. हो, मानसशास्त्रात” बोलणे” अपरिहार्य” असते नाहितर त्यांना
रोग-चिकीत्सा करताच येत नाही.कोणताही डॉक्टरला काय होतेय सांगितल्याशिवाय औषधे कसा
देऊ शकणार? त्यासाठी बोलता येणे/व्यक्त होणे अत्यंत महत्वाचे आहे. आणखीन एक कारण मला
असे वाटते,विभक्त कुटूंबपद्धतीमुळेही हे बोलणे कमी झाले असावे. दोघे नोकरी करुन दमुन
आल्यावर मुलांशी बोलायला वेळच नसतो आणि असला तरी इतर कामे करण्यात वेळ निघुन जातो.
तीच सवय मुलांनाही नकळत लागत जाते. ते बोलणेच सोडुन देतात कारण ऐकायला कोणी नसते.
अशा वेळेचा
सदुपयोग मग ते इतर मार्गाने शोधुन काढतात. मित्र-मंडळीही फारशी त्यांना साथ देत नाहीत.
ज्यांना देतात ते थोडे तरी दुस-यांशी संवाद साधतात पण ठराविक स्वरुपातच. मग असे होत
होत एक दिवस ताण-तणावाचे रुपांतर समस्येत कधी होते तेही कळत नाही आणि खुप जास्त होते
तेव्हा वेळ निघुन गेलेली असते. त्यासाठीच करियर, मुले,संवाद आणि समाज अशा एकात एक गुंतून
चालणारे घटक केवळ असंवादामुळे कधी कधी उघडी पडते तर कधी कधी नको ते बोलुन एकमेकांपासुन
दुरावते. बरे हे सगळे झाल्यावर समजावयाला,माघार घ्यायलाही कोणी नसते तयार! तेव्हा सामाजिक,आर्थिक आणि शारीरीक घडणीमध्ये हे एक बोलणे किती आवश्यक आहे ते आपल्याला कळेल. वयाच्या
कोणत्याही टप्प्यावर हे बोलणे आवश्यकच आहे हे लक्षात घेऊन तसा सगळ्यांनीच प्रयत्न करावा
असे वाटते.
Comments
Post a Comment