1.महर्षी व्यास
“ते लोक होते वेगळे-घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबुन पाहतो-
मागे किती जण राहिले?”-इती सुरेश भट
माझ्या सर्व गुरुंना वंदन करुन मी हेमहाभारतातील व्यक्तीरेखा (शिवधनुष्य) लिहिण्याचा प्रयत्न सुरु करत आहे. महाभारताचे कर्ते आणि धर्ते,जगातील सर्वोत्तम कलाकृती लिहायला गणपतीला भाग पाडणारे, कुरु वंशाचे गुरु आणि महाकाव्य आणि इतिहासाचे दिग्दर्शक,लेखक आणि काही प्रमाणात साक्षीदारसुद्धा. गुरुंचे गुरु म्हणुन महर्षी,आद्य गुरु,योगायोगाने आज शिक्षकदिना निमीत्त त्यांच्याबद्दल लिहिण्याचा समसमा योग जुळुन आला. याआधीही मि माझ्या एक लेखात “-हदयस्थ गुरु” असा उल्लेख आलेला आहे. महाभारतातल्या अनेक व्यक्तीरेखेंपैकी पहिली आणि महत्वाची आदर्ष व्यक्ती म्हणुन “महर्षी व्यास” यांचे नांव घ्यावे लागेल. अठरा पुराणे आणि ब्रम्हसुत्रांची रचनाकार म्हणुनच महर्षी मानले जातात. महर्षी व्यास यांना “वेदव्यास” असेही म्हणतात कारण त्यांनी वेदांचे संकलन करुन जगापुढे एक आदर्ष ठेवला आहे. ऋषी पाराशर आणि माता सत्यवती यांचे हे पुत्र,सात चिरंजीवापैकी एक चिरंजीव मानले जातात.
व्यासांचे
मुळ नांव कृष्णद्वैपायन असे होते. व्यासांनी एकाच वेदाचे चार भागात (ऋग्वेद,सामवेद,यजुर्वेद
आणि अथर्ववेद) विभाजन केल्यामुळे त्यांना व्यास ही उपाधी मिळाली. भुमितीमध्ये वर्तुळाच्या
केंद्रातुन जाणारी वर्तुळाच्या परिघावरिल दोन्ही बाजुंना जोडणारी रेषा म्हणजेच “व्यास”
होय. विश्वात्माक परिघाचा व्यास एकच असतो,त्रिज्या मात्र अनेक असतात. एका या “व्यासाने”च
जगाला विश्वास आपल्या कलाकृतीतुन असा दिला की, अनेक प्रसंगात श्वासही रोखायला लावला.
दैंनदिन जीवन,माणुस आणि वर्तुणुकीचा इतका खोल अभ्यास करुन विश्वाला योग्य मार्गदर्शन
करणारी,तसेच आजच्या कलियुगातही प्रेरणादायक ठरणारी कलाकृती निर्माण करण्याचे श्रेय
यासाठीच व्यासांना दिले जाते. कोणत्याही बिकट पेचप्रसंगात व्यासांचा सल्ला घेण्यावर
कुरुवंशियांचा भर होता. त्या काळातिल चातुर्वर्ण्य
व्यवस्था, विवाहाचे निर्बंध,कुमारिका, स्त्री-पुरुषांची कर्तव्ये, संकर जातीचे कर्तव्ये
यावरही व्यासांनी प्रकाश टाकला आहे. धर्म,आचार,
व्यवहार, राजधर्म,मोक्ष, अन्नग्रहण अशा अनेक विषयांचे सखोल व समग्र ज्ञान असणारा हा
एकमेव ऋषी असावा. भावभावनांचा विचार,आक्रोश, वेदना,संवेदना, मत्सर, मित्रत्व,शत्रुत्वा,
कपट, दंभ,अशा परस्पर विरोधी विषयांचाही सुयोग्य मेळ साधणे सोपे नाही. असामान्य प्रतिभेखेरिज
ही कसरत करता येणे शक्यच नाही.
माता
सत्यवतीच्या आज्ञेचे पालन करुन करुवंशाला 3 वेगवेगळ्या प्रकारे (धृतराष्ट्र, पंडू व
विदुर) पुत्र प्राप्त करुन देणे. असे अनेक आधुनिक तंत्रज्ञान त्यावेळी किती विकसित
होते याचीही प्रचिती येते. तसेच त्यांचा पुरोगामी विचार सरणीही यावरुन आढळुन येते.
संजयला दिव्यदृष्टी देऊन धृतराष्ट्राला युद्धभुमीचे अद्ययावत वर्णन ऐकवणे. यावरुन केवढी
ही शक्ती, दुरदृष्टी तसेच संकटातुन मार्ग काढण्याची वृत्तीही दिसुन येईल. विशेष म्हणजे
हे सगळे एका त्रयस्थ वृत्तीने लक्षात ठेऊन तसे लिहुन घेणे आणि एक इतिहास निर्माण करणे
हे एक असमान्य व्यक्तिच करु शकते.
धर्म,अर्थ,काम व मोक्ष या पुरुषार्थापैंकि
मनुष्य कायम अर्थ व कामाच्या मागे लागलेला असतो. धर्माचरणातुनच हे प्राप्त होऊ शकते
हे त्याला का कळत नाही? हा व्यासांना पडलेला प्रश्न आपण अजुनही सोडवू शकत नाही हे विशेष.
त्यासाठिच त्यांनी ”सुख-दु:खे किंवा प्राणभय न बाळगता धर्माचरण केले पाहिजे” असे स्पष्ट सांगितलेले
आहे. तसेच स्त्री शक्तीचेही उदात्तीकरण त्यांनी स्त्री व्यक्तीरेखेतुन दाखवुन दिलेले
आहे. तेव्हाच्या स्त्रिया आतापेक्षा जास्त बंडखोर,सुधारक आणि धाडसी वृत्तीच्या आढळुन
येतील. पुरुष संयमी,नम्र व धाडसी महत्वाकांक्षा आणि विजय प्राप्त करणारे असेही दाखवलेले
आहेत. हळुहळु आपण या सर्वांचा परिचय करुन घेणारच आहोत.
अशा या महान गुरुला माझे शतश: प्रणाम/त्रिवार वंदन.
Comments
Post a Comment