2. सत्यवती

        व्यासांची माता व कौरव-पांडवांची पणजी म्हणजे सत्यवती. व्यासाची आई म्हणुन नक्किच स्पृहणीय ठरते तर घराण्याला “वारस” हवा म्हणुन व्यासाला नियोग पद्धतीने ( जे आज सरोगसी किंवा टेस्ट-ट्युब बेबी तंत्रज्ञान मानतात) किती प्रगत कि (संकुचित?) विचाराची दिसुन येते. तसेच भिष्माच्या (सावत्र गंगापुत्र )सद्गुणांची पारख करुन सत्यवतीने त्याला राज्यकारभार सोपविला. एकुण 4 पिढ्या पाहिलेली ही स्त्री अनेक भावनीक, मानसिक, सामाजिक स्थित्यंतरातुन जात असतांना किती होरपळली गेली असेल याची आपण आत्तासुद्धा कल्पना करू शकणार नाही. शंतनुबरोबरचा विवाह एक आपमतलबी संकुचीत करारातुन झाल्यामुळे कुठेतरी  अपराधी भावना सतावत असावी. तसेच भिष्माचा त्याग लक्षात घेऊन भावी सुनांना भिष्माला आणायला पाठवते.

     सत्यवती एका  राजाची मुलगी असुनही तिचा संभाळ एका कोळयाने केला होता. कुमारी असताना पराशर मुनीच्या मोहाला बळी पडल्यानंतर तिला “व्यास” हा मुलगा झाला. नंतर तिचे लग्न शंतनु राजाशी झाले. सत्यवतीने गरिबीपासुन राजवैभवापर्यंत सर्व अनुभव घेतले. तिने सर्व संकटे समर्थपणे झेलली. पती लवकर वारला, पुत्र तारुण्यांत तर एक नातुही अकाली वारला. आता कशाला जगायचे म्हणुन तिने सवत: व तिच्या दोन्ही सुना तपश्चर्येसाठी वनात निघुन गेल्या. राजमाता असुनही वृद्धपणी वनात दिवस काढले. एकप्रकारे संन्यास स्विकारुन सुनांच्या संसारात ढ्वळाढवळ करु नये याचा आदर्ष समाजापुढे ठेवला.

      मातृत्व,वंशविस्तार कि हस्तिनापुरचे साम्राज्य टिकविणे अशा द्विधा मन:स्थितीत तिला जे योग्य वाटले तसे तिने तेव्हाच्या परिस्थितीतुन मार्ग शोधला. नियती या निर्णयाचे काय परिणाम घडविणारे हे तिला कुठे माहित होते. पण जेव्हा कळले तेव्हा एकप्रकारे धर्मयुद्ध व्हायला हातभारच लावला असे वाटते. आपल्याच पुत्राला राज्यपद या हट्टापुढे भिष्माची अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा झाली. त्या प्रतिज्ञेमुळे आणि मुलांच्या अकाली मृत्युमुळे राज्याला वारस कोण? हा प्रश्न उद्भवला. त्यावरही तिने व्यासांना बोलावुन मार्ग काढला पण तिथेही ती अपयशीच ठरली कारण तिन्ही मुले राज्य चालवायला असमर्थच ठरले. प्रत्यक्षपणे भिष्मांनीच ही जबाबदारी( काका असुनही) पेलली.

      एकुणच जे जे मार्ग शोधले ते ते नंतर अपयशीच ठरले. “मत्स्यगंधा” हे नाटक यासाठीच लिहिले गेले असावे. तरीही खंबीर स्त्री शेवटी नंतरचा राज्यासाठी होणारे भांडण बघुन डगमगलिच आणि नाईलाजाने तिला वानप्रस्थ स्विकारावे लागले. नंतर कुंतीचीही तशीच अवस्था झाली होती. काही (चुका/ इतिहासातील) घटना पुन्हा घडतात असेच म्हणावे लागेल. आजही अशा कणखर स्त्रियांना सामने/संघर्ष करावेच लागतात. मातृसत्ताक पद्धती कमी-अधिक प्रमाणात असुनही त्याग,प्रेम आणि कर्तव्यासाठी स्त्रिलाच बांधील समजुन निर्णय घ्यावे लागत असत. कोणतेही स्त्री-स्वातंत्र्याचे गोडवे न गाता समाजही हे व्यवस्थित मान्य करत होता हे विशेष.

       मत्स्यगंधा ते सत्यवतीचा प्रवास एक शापित राजकुमारी असेच म्हणावे लागेल.त्या दृष्टीने विचार केला तर सत्यवती ही एक आदर्ष मुलगी, प्रेयसी, पत्नी,माता,सुन आजी आणि पणजीदेखील होती असेच म्हणावे लागेल. राहिले दोषाबद्दल तर महाभारतातील प्रत्येक  व्यक्तीरेखा आदर्ष आहेच पण (पुर्णपणे आदर्ष नाही) अवगुण असलेली तसेच प्रचलित व्यवस्थेशी जुळवुन घेणारी,संघर्ष (जिथे आवश्यक असेल तिथे)करणारी अशीच दाखवण्यांत आलेली आहे. आपण यातुन जेवढे चांगले तेवढेच घ्यायचे वाईट सोडुन द्यायचे.  



 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव