Posts

जगा आणि जगू द्या त्यांना त्यांच्यासारखे…

Image
                                    जगा आणि जगू द्या त्यांना त्यांच्यासारखे…           मध्यंतरी एक लेख वाचनात आला, “ जंगलाला धडकी भरलेली आहे, ” लेखाचा मतितार्थ असा होता की, आता सुट्ट्या पडणार आणि वेड लागल्यासारखी माणसे निसर्गाकडे/जंगलाकडे धावत सुटणार!  त्यामूळे जंगलातील रहिवासी, प्राणी, पक्षी, फुले, झाडे यांना त्याचा त्रास होतो. एकतर शांतता भंग पावते तर दुसरीकडे कचरा ,गोंधळ, आवाजामुळे त्यांना त्रास होतो, त्यांच्या नेहमीच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. जसे माणूस पाहूणा म्हणून कधीतरी गेला तर बरे वाटते. सारखे कोण ना कोण येतच राहिले तर घरातले सगळेचजण वैतागतात तसेच. काही घरात कायम ही सवय असते त्यांना काही फरक पडत नाही म्हणा !           पुर्वी सहसा माणसे कारणाशिवाय “ फिरायला ” म्हणून असे घराबाहेर पडत नसत.  प्रवासाची साधनेही नव्हती, पैसाही गाठीशी नव्हता. मला आठवते, वडील रेल्वेत आहेत म्हटले ...

रंग बरसे…..

Image
               ‘रंग बरसे’ हे गाणे आणि अशी अनेक गाणी होळीनिमित्त आपल्याला ऐकायला मिळतात. नवरंग मधले  “ जारे नटखट असु दे ”  नाहीतर मराठीतील “ खोडी कशी काढली.. ” “ रंगात रंगुनी.ऱाधा बावरी ” असू दे. रंगाचे महत्व तसेच कृष्णाचा खोड्करपणा अधोरेखीत करणारी ही गाणी ऐकून, बघून, नाचून वेड  लावतात. वर्षाच्या शेवटचा सण म्हणून ” होळी ”   रंगपंचमी साजरी केली जाते. कोकणी माणूस तर गणपती आणि होळीला गावी गेल्याशिवाय राहूच शकत नाही. एक निसर्गाची अवस्था ( येऊ घालणारी), थंडी कमी होते, पाने झ्डतात, नवीन पालवी फुटायची वेळ झालेली असते. रंगांची ओळख आपल्याला लहानपणीच करुन दिली जाते. त्याचे आकर्षण शेवटपर्यंत असतेच. शेतात धान्यपण (उन्हाळी) पेरा यची वेळ झालेली असते या सर्व हेतुने या सणाला विशेष महत्व दिसून येते. रंगाच्या दुनियेत माणुस, फुले, पाने, फळे,  पशु-पक्षीसुद्धा हरवून जातात. काही ठराविक रंग कोणाला आवडीचे असतात तर काही जणांना अजिबात आवडत नाहीत विशेष करुन काळा, तपकिरी, ग्रे. या रंगाशिवाय जगण्याची शिक्षा देव काहीजणाना  देतो तेव्हा वाईट वाटत...

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

Image
            नुकतीच एका घरगुती पार्टीला जाण्याचा योग आला नेहमीप्रमाणेच घरी बनवलेले कमी आणि बाहेरुन आणलेले/ मागवलेले जास्त असे अनेक पदार्थांची रेलचेल होती. सगळे काही झाल्यावर काही पाहूणे  थोडे उशीरा यावयाचे असतात त्यांच्यासाठी आणि स्वयंपाकाचे उरलेली सामान आवरण्याची गृहिणीची कसोटी लागते तेव्हा हा फ्रिज / शीतपेटी अगदी मदतीला धाऊन येते.  मोठे सामान मुकपणे सर्व काही पोटात सामाऊन घेत असतो.  तरी नाक मुरडणारे जेवण   “ थंडच होते हो ”  म्हणून सगळा मूड घालवणारेही कमी नसतात. वेळेवर सगळे मागवणे, वाढणे, फजिती  होऊ नये म्हणून आदल्या दिवशीच तयारी करुन ठेवणे. कच्चा माल तयार ठेवणे  (खोबरे किसून ठेवणे, मसाला वाटून ठेवणे, कोशिंबीर किसून ठेवणे, स्टार्टर कच्चे तयार ठेवणे..) अशा अनेक कामात मदत करणारा यांत्रिक मदतनीस आणि जेवण वाया जाउ न देणारा उपकारक/ देव म्हणून या फ्रिजचे  नक्कीच मोठे कौतूक वाटते.           आमचे घर मात्र या फ्रिजच्या बाबतीत उपाशीच राहत असावा. सकाळचे जेवण संध्याकाळी न खाणा-यांना...

पावलोपावली आढळणारे/ पावणारे देव/ देवळे? / प्रार्थनास्थळे

Image
               रस्त्यावरून चालताना पावलोपावली आपल्याला अनेक शेंदुर फासलेले दगड आणि अवती भोवती/झाडामागे/ खाली (विशेषत: पिंपळ, उंबर किंवा वड) येथे मुर्त्या / फोटो / प्रार्थनास्थळे आढळतील. कोण हे सगळे करते आणि का हा मला कायम पडणारा प्रश्न! त्यातच एक बातमी वाचनात आली. केरळ हायकोर्टाने एका निर्णयात “ देवळे म्हणजे सार्वजनिक जागेचा अपव्यय होय” असा निर्णय दिल्यामुळे हा विषय लिहावासा वाटला.               कित्येकदा मनपा / शासन आणि स्थानिक रहिवासीसुद्धा काही करू शकत नाही. धार्मिक भावना आड येतात ना! अहो, प्रत्यक्ष देवाला जरी विचारले तर तोही म्हणेल, अरे, मला असे नको रे उन्हा-तान्हात उभे नको करुस! “देव नाही देव्हा-यात...ऩको शोधु काशी-विश्वेश्वर… अशा अनेक गाण्यातुन हेच सांगण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. ऐकेल तर तो मानव कसला? यामागे बरेच हात गुंतलेले असतात असेही माझ्या कानावर आले. एक म्हणजे काळा पैसा कसा संपवायचा याचे उत्तर. दुसरे म्हणजे मिळणारा मोठेपणा आणि तिसरा होणारा आर्थिक लाभ आणि   या...

जय हो विज्ञान !

Image
              नुकताच “ 28 फेब्रुवारी ” नेहमीप्रमाणे रोजी “ विज्ञान दिन ” साजरा झाला. आम्ही दोघेही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी त्यामुळे विज्ञानाचे कायम कुतूहल आणि निर्माण होणारी जिज्ञासा शांत बसू देत नाही. मुलींनी अभियांत्रीकीला प्रवेश घेतल्यामुळे तर विज्ञानाची जिज्ञासा जास्तच वाढत गेली. विज्ञानाच्या अनेक शाखा आहेत,- त्यातल्या सगळ्याच शाखा समजून घेणे कठिण आहे परंतु दैंनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नेहमीच आपला संबंध विज्ञानाशी येतोच फक्त आपण लक्षपुर्वक त्याचा विचार करता येत नाही एवढेच. विज्ञान आणि तंत्रज्ञान हातात हात घालून चालत असल्यामूळे सर्वसामान्य जनतेला त्याच्याबद्दल उत्सुकता असते आणि त्याचा वापर जिवनात होतो..             असंख्य प्रयत्न, प्रचंड मेहनत, शोध, निरिक्षण आणि निष्कर्ष याबाबत कुणालाही सोयरसुतक नसते. जेव्हा त्याचे फळ दृष्टीस पडते तेव्हा खरे तर तो त्यांना चमत्कार वाटतो. उदा, द्यायचे तर आताचे मोबाइल, नळाला पाणी येणे, गरम होणे, वाशिंग मशिन किंवा अगदी टयुब्लाइटचे देखील देता येईल.    ...

सोनेरी आवाज हरवला….. आणि मन उदास झाले….

Image
               नकळत्या वयात रेडिओ आणि रेडिओ सिलोनचा जो संबंध सुरु झाला तो केवळ श्री. अमिन सयानी यांच्या आवाजामुळेच. एखाद्या आवाजाचे वेड लागणे म्हणजे काय ते या आवाजाने शिकवले. लहानपणीचे “ स्टाईल आयकोन ” असे म्हटले तरी हरकत नाही. त्यांचे उर्दुमिश्रीत हिंदी आणि मिष्कील बोलणे कधी एकदा ऐकतो असे व्हायचे. त्यामध्ये घरातले सर्व आबालवृध्द्द सहभागी असत. आई-वडिल, भाऊ आणि मी उर्दू भाषेची माझी आवड त्यांच्या बोलण्यातूनच निर्माण झाली असावी असे वाटते. एवढी की एकाने एकदा तसे बोलूनही दाखवले, “ मॅडम आपके उर्दू उच्चारण इतना सहज कैसा है? ” लहान वयात बोलण्याने/ऐकण्याने एवढा प्रभाव पडू शकतो हे त्यादिवशी मला कळले. तेव्हा माझी हिंदी बंबैय्या नव्हती त्यामुळे असेल, फार जुनी गोष्ट आहे ही ! ( साधारण सन 87-88 च्या दरम्यान).1993 च्या नंतर शासकीय कार्यालयात लागल्यामुळे हळुहळू शुद्ध हिंदी बोलणे कमी झाले.                 एखादा बुधवार “ बिनाका गीतमाला ” नाही मिळाले ऐकायला तर अगदी चुकल्या- चुकल्या सारखे वाटायच...

मला मराठी शाळेने काय दिले?

              “ मला मराठी शाळेने काय दिले? ” हा निबंधाचा विषय दिलेला होता. मला नक्की काय लिहावे ते कळेना. 50 वर्षे मागे गेल्यावर अनेक आठवणी जाग्या झाल्या. तसेही शाळा हा माझा विकपोईंट आहे, /मग ती कुणाचीही असु दे. यांच्या लालबागची शिरोडकर शाळेतसुद्धा जाण्याचा योग ब-याच वेळा आला. स्वत : अनेक परिक्षा देताना, परिक्षा केंद्रावर कर्तव्य बजावताना, निवडणुकीच्या वेळी, काही उत्सव साजरा करतांना, काही वर्ग (योगा, छंद जोपासणे, कला शिकणे ..) भरतात तेव्हा शाळेला भेट देणे मला खुप आवडते. अगदी मुलींच्या शाळेतसुद्धा मला जायला अजुनही आवडते. कोणत्याही शाळेत गेल्यावर लहान होउन पुन्हा वर्गात बसावेसे वाटते.  माझी स्वत:ची शाळा तर नक्कीच विसरणार नाही.                मी 6 व्या वर्षी थेट दुसरीत प्रवेश घेऊन जवळच एक शाळा होती तिथे मी 4 थी पर्यंत शिकले. त्यानंतर 5 वी पासून घरापासून जरा लांब शाळेत जिल्हा परिषद, नांदेड येथे शाळेत प्रवेश घेऊन माझ्या नवीन शालेय जीवनाचा आरंभ झाला. ही शाळा खूप मोठी होती सर्वार्थाने! म...