Posts

मेंदुविरर्हित मानव शक्य आहे ?

Image
                 नुकतेच “मनात…” अच्युत गोडबोले लिखित पुस्तक वाचनात आले. हे पुस्तक अमेरिकेला जाण्यापुर्वी वाचुन,त्याबद्दल लिहुनपण झाले होते. लेख प्रकाशित करायचे राहुन गेला होता. आता जवळपास 5 महिन्यांनी आल्यावर पुन्हा लिखाण सुरु केलंय म्हणुन हा लेखन-प्रपंच. ह्या पुस्तकाचा मथळा (Tagline) “मानसशास्त्र उत्कंठावर्धक  रम्य  स फर” अशी होती. त्यानंतर नेमके आता 15 दिवसांपुर्वीच  डॉ.  ्श्री. आनंद नाडकर्णी यांचे निधन झाले त्यानिमित्तही हा वि ष य  निवडला गेला. हे पुस्तक वाचुन, त्यावर लिखाण करुन एकप्रकारे त्यांना ही श्रद्धांजली दिली असेही म्हणायला हरकत नाही. या पुस्तकाचे लिखाण करतांना संदर्भ आणि विशेष सुचना नाडकर्णी साहेबांनी दिल्या होत्या असे गोडबोलेंनी प्रास्तविकात लिहिलेले आहे. तसेच भारतात मानसशास्त्रज्ञ अगदि हातावर मोजण्याइतके आहेत बघुन आश्चर्यदेखील वाटले. खरे तर भारतात जास्त वाव आहे मानसशास्त्राच्या अभ्यासाला!पण एवढी मेहनत,संयम,अभ्यास आणि संवेदनशीलता कुठे मिळणार? असो.          29 पानां...

First song trial!

https://share.icloud.com/photos/048W_-8iqxT6XfE8g25lisNcA +14086675761 https://www.facebook.com/share/v/1Hpoxfp2QD/ बाळासाठी चारोळी गोरे गोरे पान,फुलासारखे छान, बाळ कसे दिसते छान छान, बाळाचे नाव आहे ईशान, सगळयांची,घराची आहे शान!💞

वहिनीची आई

Image
              दि.4.1.26 रोजी वहिनीची आई (श्रीम. मंगला   आकलेकर) वय वर्षे 93, यांचे निधन झाल्याची बातमी ऐकली आणि मन सुन्न झाले. त्यांच्या अनेक आठवणींनी मन भरुन आले. साधारण 40-43 वर्षांपुर्वी “ वहिनीची आई”म्हणुन माझा त्यांच्याशी ओळख झाली ती आजतागायत तशीच मनात घर करुन राहिलेली आहे. त्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध गेल्या 20-22 वर्षांत आला. काही काही व्यक्तींचे अनन्य साधारण महत्व कधी कमी होऊच शकत नाही. उलट आदर, अभिमान, चिकाटी,जिद्द आणि शिस्त यामुळे ती व्यक्ती अधिकच अनुकरणीय ठरते. प्रेमळ, सगळ्यांना सांभाळुन घेण्याची वृत्ती, मदतीचा हात कायम पुढे तर ज्ञान, अभ्यास आणि कौशल्याचा अनोखा संगम एकाच व्यक्तीत कसा काय असु शकतो हा मला प्रश्न पडणा-या व्यक्तींमध्ये त्या सगळ्यात जेष्ठ आणि श्रेष्ठ होत्या याबद्दल सगळ्यांचेच एकमत असावे.            मी सगळ्यांत लहान म्हणुन आणि माझी आई गेल्यापासुन त्यांना मी आणि मला त्या जास्तच जवळ वाटायच्या. त्यांच्याजवळ बसुन गप्पा मारणे कदाचीत मीच करत असे. त्याही अगदी मनापासुन बोलाय...

आयुष्यावर बोलु काही

Image
                                                                         !! श्री!!                                                                                                                सौ. पुनम हेमंत भांगले,       ...

नकटे व्हावे परी न धाकटे न व्हावे

Image
                मराठीतल्या म्हणी ह्या किती समृद्ध आणि उपयोगी व अनुभवी असतात हे ह्या वाक्यावरून दिसुन येते. वास्तविक मुली नकट्या असल्या कि, त्यांना नाकावरुन गाडी गेली किंवा “मुमू” (मुमताज)चे नाक असे चिडवायचे. तेव्हा कळत नव्हते पण आता समजते. आता नेमके आठवायचे कारण म्हणजे आम्ही शेंडेफळ म्हणुन प्रसिद्धच आहोत. लहान असल्याचे सगळे फायदे घेऊन झाल्यावर आता काय झाले? असे तुम्ही म्हणाल पण काहीतरी सारखे खुपत असते ना ( जिथे गुप्ते असतात) तसे हल्ली आपल्याला ब-याच वेळा डावलले जाते असे माझ्या लक्षात येतेय. रिकामे डोके चालते ना तसे काहीतरी. माझी नोकरी,मुली आणि संसार यामध्ये व्यस्त असल्यामुळे परस्पर काही गोष्टी मोठी लोक ठरवल्यानंतर सांगत आणि मलाही त्यात कधी गैर वाटत नसे. मग आताच का असे वाटेल तुम्हाला?             साधारण 50-60 च्या दरम्यान असलेल्या सगळ्यांचेच हे दु:ख असावे कदाचीत. मोठे भाऊ,बहिणी,सुना,जावई यांना जेवढा मान मिळतो तेवढा धाकट्यांना मिळतो का विचारा? पुर्वी तर एकत्र कुटूंबात मोठ्याचा कायमच मान राखला ...

आकर्षणाचा सिद्धांत

Image
                   दिनेश खत्री आणि इंदु खत्री लिखित नुकतेच “ आकर्षणाचा सिद्धांत” हे पुस्तक वाचण्यात आले. एकुण 17 प्रकरणांतुन पुस्तक उलगडत जाते. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला समजावले जाते. त्यातील काही विचार करुन अंमलात आणण्यासारखे काही मुद्दे मुद्दाम लिहित आहे. ते शिर्षक वाचल्यावरसुद्धा आपल्या लक्षात येईल. 1)     भावना,विचार,विश्वास आणि कृती- यांचा समन्वय. 2)     अनुबंध,पैसा,व्यवसाय,आरोग्य आणि तुमच्या ईच्छांचे साकारीकरण 3)     अमर्याद असलेल्या उर्जेचा/क्षमतेचा वापर कसा करावा. 4)     जे जे हवे ते मिळु शकेल फक्त योग्य दिशा आणि ,मार्गदर्शन हवे. 5)     कालची जादु हे आजचे विज्ञान तर आजची जादु उद्याचे विज्ञान. 6)     उर्जा नष्ट होत नाही,निर्माण करता येत नाही पण वळविता येते. 7)     भगवदगीता आणि आकर्षणाचा सिद्धांत. 8)     उर्जेचा स्त्रोत माझ्यात आहे तर मी देव आहे. 9)     जन्म मरण हे फक्त देहाला ला...

सौजन्याची ऐषीतैशी

Image
                मध्यंतरी के.बि.सीच्या मंचावर एका लहान मुलाने अमिताभ बच्चन यांना उलट उत्तर दिले यावरुन अनेक मते नोंदवली गेली. त्यावरुन सौजन्याचे महत्व लोकांच्या लक्षात आले असेलच. सौजन्याने वागणे दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे का? याबाबतीत पाश्चिमात्य लोकांचे अनुकरण करावयास हरकत नाही. विशेषत: अमेरिकन लोक शिष्ट आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध असले तरी सौजन्य अगदी ओतप्रोत भरलेले असते. अगदी अनोळखी माणसालासुध्दा गूड मॉर्नींग म्हटल्याशिवाय पुढे जात नाहीत. थोडीशी मदत केली/त्रास झाला तर लगेच “थॅंक यु” “सॉरी” म्हटल्याशिवाय पुढे जाणारच नाहीत.ज्याला आपण एटिकेटस,मॅनर्स , लॉजीकल वागणे म्हणता येईल. याऊलट काहीजण साधे साधे नियम, माणुसकीसुद्धा दाखवायला तयार नसतात. याला काय म्हणावे सौजन्याची ऐशीतैशी” का?             सोप्या,छोट्या छोट्या गोष्टींतुन,कृतीतुन, बोलण्यातुन हे दिसुन येते. सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे असेही काही दिवसांनी “क्लासेस” काढावे लागतील का असे कधीकधी वाटते. ट्रेनमध्ये, लिफ्टमध्ये घाईघाईत चढतांना त्या...